Tuesday, 28 January 2025

3 फेब्रुवारीला लोकशाही दिनाचे आयोजन

 

जालना, दि.28 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही  दिनाचे  महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येते.   त्यानूसार जालना येथील   जिल्हाधिकारी कार्यालयात   जिल्हास्तरीय  लोकशाही   दि   सोमवार  दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आयोजित  करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी  नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

              लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा.  लोकशाही  दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे,  राजस्व,  अपील,  सेवाविषयक,  आस्थापनाविषयक बाबी  विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.   तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना  https://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment