Friday, 10 January 2025

 

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

 

          जालना, दि. 10 (जिमाका) :-  जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून दि. 12 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत विविध शाळा व महाविद्यालयांच्या संयुक्त़ विद्यमाने युवा दिन युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा सप्ताहात गायन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, स्वच्छता मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात येणार असून शाळा, महाविद्यालय, संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या योजनेद्वारे संपूर्ण भारतामध्ये स्वामी विवेकानंद यांचा जन्म़ दिवस 12 जानेवारी हा युवा दिन म्ह़णून साजरा केला जातो. तसेच 12 ते 19 जानेवारी हा कालावधी युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. देशाची सर्वांत मोठी शक्त़ी ही युवा शक्ती असून युवकांमध्ये असलेल्या सुप्त़ गुणांना विकसित करण्यासाठी व 15 ते 35 वयोगटातील युवकांसाठी एक संदेश या माध्य़मातून देण्याचा प्रयत्न या सप्ताहाद्वारे करण्यात येतो. अधिक माहितीसाठी युवा सप्ताह कार्यक्रम प्रमुख रेखा परदेशी मो.9022951924 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment