Tuesday, 28 January 2025

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज करावेत


जालना, दि.28 (जिमाका) :- जिल्ह्यातील जालना तालुक्यातील सेवली, देवमुर्ती आणि मंठा तालुक्यातील तळणी तसेच भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करावयाची आहेत. तरी जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण भागीदार नियुक्त करण्यासाठी संस्थांनी जालना येथील कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात दि.1 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकासरोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर  यांनी केले आहे.

-*-*-*-

No comments:

Post a Comment