जालना, दि.24 (जिमाका) :- मौलाना आजाद
अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी डिलीव्हरी बॉय, वाहन कर्ज
आदि नवीन योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. या प्रकारची अफवा सोशल मीडिया तसेच
कथित दलालाद्वारे पसरविल्या जात आहे. तरी अशा प्रकारच्या कोणत्याही नवीन योजना
सुरु करण्यात आलेल्या नसल्याने या अफवांपासून तसेच आर्थिक फसवणुकीपासून सावधानता
बाळगावी, असे आवाहन संचालक शाह आलम खान व
जिल्हा व्यवस्थापक एकनाथ कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक
विकास महामंडळामार्फत राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त निगम यांच्याकडून कर्ज
स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून शैक्षणिक कर्ज, मुदत कर्ज, सुक्ष्म पतपुरवठा
कर्ज अशा प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. सद्यस्थितीत शैक्षणिक कर्ज
योजना ही एकमेव चालु आहे तर बाकीच्या योजना पुढील आदेशापर्यंत बंद आहेत. तरी
अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडू नये तसेच कोणी
आर्थिक फसवणुक करीत असल्यास संबंधित व्यक्तीविरुध्द जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये तक्रार
नोंद करावी. जेणेकरुन आपली व इतर नागरिकांची फसवणूक होणार नाही. जालना शहरातील
दुखी नगर, मिल्लत नगर, तट्टूपुरा आणि कुचरवटा आदि वसाहतीमध्ये काही महिला कर्ज
मंजूर करुन देते म्हणून इतर महिलांकडे पैशांची मागणी करीत आहेत. अशा आशयाची तक्रार
संचालक शाह आलम खान यांच्याकडे प्राप्त झाली आहे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment