Monday, 2 June 2025

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

 


              

जालना, दि.2 (जिमाका) :- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे अंतर्गत महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती योजनेद्वारे मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. यामध्ये 50 जागा पदव्युत्तर पदवी, पदविका आणि 25 जागा पीएच.डी च्या विविध अभ्यासक्रमासाठी राखीव आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी सारथीच्या fs.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपव्यवस्थापकीय संचालक सारथी, विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment