Monday, 23 June 2025

हरवलेली मुलगी आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

 


जालना,दि.23 (जिमाका) :- जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी सोनु उर्फ शिवांजली गोरख आढे उर्फ शिवांजली संदीप राठोड वय 16 वर्षे  7 महिने असलेली मुलगी  हरवली आहे. मुलीची उंची अंदाजे 4.5 फुट असून रंग सावळा, चेहरा लांबट तसेच केस काळे, पोशाख गुलाबी व हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज व त्यावर पांढऱ्या रंगाचे लेडीज स्वेटर, कानात पिवळ्या धातुचे झुंबर, शिक्षण झालेले नाही.  तिला भाषा मराठी व बंजारा येते. या  वर्णनाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन घेवून गेल्याची  नोंद घनसावंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तरी या वर्णनाची मुलगी कोणास आढळून आल्यास पोलीस ठाणे घनसावंगी येथे सहा.पोलिस निरीक्षक (मो.9421666518) आणि पोलिस निरीक्ष्ज्ञक केतन राठोड (मो. 9011031979) असा असून हरवलेल्या मुलीच्या संबंधित माहिती असल्यास पोलिस विभागास भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment