जालना,
दि.2 (जिमाका) :- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ
यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाभरामध्ये विविध स्तरावर तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ
सेवनाचे दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यासाठी व कोटपा 2003 कायद्याची अंमलबजावणी
विविध विभागासोबत करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू
नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जालना सामान्य रुग्णालयाच्या वतीने 1 मे ते 31 मे 2025
या कालावधीत जागतिक तंबाखु नकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
31 मे
जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सिग्नेचर कॅम्पेन,
सेल्फी पॉईट चे उद्घाटन, नर्सिंग विद्यार्थी यांच्यासाठी पोस्टर स्पर्धा व जनजागृतीपर
रॅली, विधीसेवा प्राधिकरण जालना यांचे व्याख्यान व तंबाखु विरोधी शपथ असे विविध
कार्यक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था ठिकाणी संस्थेतील सर्व
अधिकारी- कर्मचारी यांच्याद्वारे तंबाखु विरोधी शपथ घेण्यात आली. जालना येथील औद्योगिक
प्रशिक्षण संस्थेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात
आला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र गाडेकर यांनी मार्गदर्शन
केले. नशाबंदी मंडळाचे बिसमिल्ला सय्यद, विधिसेवा प्राधिकरणचे अॅड. योगेश कुलकर्णी,
जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, समुपदेशक सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या
सुनंदा कोरडे, समुपदेशक प्रमोद तांगडे व इतर अधिकारी- कर्मचारी हे उपस्थित होते. असे
जिल्हा शल्यचिकित्सक तथा सदस्य सचिव (जिल्हास्तरीय समन्वय समिती) राष्ट्रीय तंबाखु
नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले
आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment