जालना, दि.25 (जिमाका) :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस दि.26 जुन दरवर्षी सामाजिक न्याय
दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तरी सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने दि.26 जुन
2025 रोजी सकाळी 10 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना
येथे समाजकल्याण कार्यालयाच्यावतीने मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सामाजिक न्याय दिनाच्या
कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त राजू
एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
सामाजिक न्याय दिनाच्या
कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जि.प.मुख्य
कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार आदि उपस्थित
राहणार आहेत. कार्यक्रमापुर्वी सकाळी 8 वाजता नुतन वसाहत येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा
ते सामाजिक न्याय भवनापर्यंत समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. समता दिंडी नुतन
वसाहत येथून भाजी मंडई ते शासकीय रुग्णालय मार्गे येवून सामाजिक न्याय भवन येथे समता
दिंडीचा समारोप होईल. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment