जालना, दि.10 (जिमाका)
:- शैक्षणिक वर्ष
2025-26 साठी जालना येथील संजय नगरातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहात ऑनलाईन प्रवेश
प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीच्या इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश
घ्यावयाचा असल्यास www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर शासकीय वसतिगृहात
प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करून अधिक माहितीकरिता टोल फ्री क्रमांक
1800267007 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन गृहपाल,आदिवासी मुलांचे वसतीगृह,
जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment