जालना,(जिमाका)
दि.2 : महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या स्थळांना
भेट देण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी या
उद्देशाने आयआरसीटीसी मार्फत भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत 'छत्रपती शिवाजी महाराज
सर्किट' ही विशेष ट्रेन दि. 9 जून, 2025 रोजीपासून सुरु करण्यात येणार आहे.
या पाच दिवसीय विशेष
यात्रेची सुरुवात मुंबई येथून सुरुवात होणार असुन, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जीवनाशी संबंधित महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे तसेच महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक
व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना अनुभव घेता येणार आहे.या पाच दिवसाच्या
यात्रे दरम्यान पर्यटकांना रायगड किल्ला, पुणे (लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी),
शिवनेरी किल्ला, भिमाशंकर ज्योतिर्लिंग, प्रतापगड किल्ला, कोल्हापूर (महालक्ष्मी मंदीर,
पन्हाळगड किल्ला) या स्थळांचा समावेश असणार आहे. या यात्रेसाठी इच्छूक नागरिकांनी आयआरसीटीसी
या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा
यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आयआरसीटीसी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment