जालना,
दि.3 (जिमाका) :- शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागातंर्गत समाज कल्याणच्या अधिनस्त असलेल्या बदनापूर येथील अनुसूचित
जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील शैक्षणि वर्ष 2025-26 साठी प्रवेश
देणे सुरु झाले आहे.
इयत्ता
सहावीसाठी 40 जागा व सातवी ते दहावीच्या वर्गातील रिक्त असलेल्या संवर्गानूसार
रिक्त जागेवर प्रवेश पात्र इयत्ता सहावी ते दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या
अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व
दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी दि.25 जुन 2025 पर्यंत मुख्याध्यापकांशी
संपर्क साधून आपला प्रवेश अर्ज भरुन द्यावा, असे आवाहन बदनापूर शासकीय निवासी
शाळेचे मुख्याध्यापक डॉ.दिलीप गिरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment