Tuesday, 10 June 2025

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या वाहनावर केली कारवाई

 


 

जालना, दि.10 (जिमाका) :- जालना उप प्रादेशिक कार्यालयामार्फत दि. 6 व 7 जून  2025 रोजी जालना जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात आली. यामध्ये  अवैध गौण खनिज वाळू वाहतूक करणाऱ्या नोंदणी क्रमांक प्रदर्शित न केलेल्या (विना नंबर प्लेट) एकुण 46  वाहनांवर वायुवेग पथकाने कारवाई केली असून त्यापैकी 23 वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात अवैध वाहतूक रोखण्यासाठी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी दिली आहे.

             वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक

जिल्ह्यातील वाहन चालक, मालकांनी आपल्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) ही नवीनतम तंत्रज्ञानावर आधारित असून वाहनांच्या सुरक्षिततेसाठी तसेच गैरवापर रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे वाहन चोरी, नकली नंबर प्लेट आणि नियमांचे उल्लंघन होणार नाही यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याकरिता प्रत्येक वाहनचालक, मालकांनी आपल्या वाहनाची अधिकृत नोंदणी करून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) वाहनावर लावून वाहन सुरक्षितता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सर्व नागरिकांनी यामध्ये सहकार्य करून अधिकृत  हाय  सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवून वाहन रस्त्यावर चालवावे आणि  नोंदणी क्रमांक प्रदर्शित न केलेल्या (विना नंबर प्लेट) रस्त्यावर चालवू नये. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायदा व केंद्रीय मोटार वाहन नियम यातील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल. अधिक माहितीकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,जालना येथे संपर्क साधावा. असेही  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                                 -*-*-*-*-

No comments:

Post a Comment