जालना,दि.27 (जिमाका) : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गात 284 पदे भरतीसाठी दि.22 एप्रिल
2025 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तरी आयबीबीएसच्या संकेतस्थावर
यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र उमेदवारांची परीक्षा दि.1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत
ऑनलाईन घेण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी नोंदणी केलेल्या
ई-मेलवर आयबीपीएसकडून पाठविण्यात येणार आहे. असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी, जालना यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment