Friday, 6 June 2025

खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

 

जालना, दि.6 (जिमाका) :- राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर योजने अंतर्गत ऑगस्ट 2025 सत्रातील प्रवेश हे केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाद्वारे करण्यात येत आहे.

येथील हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सर्व व्यवसाय मिळून 412 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख  26 जून 2025 असून प्रवेश अर्ज निश्चित करणे व संस्थानिहाय व्यवसायाचे विकल्प व प्राधान्य क्रम भरण्याची शेवटची तारीख 27 जून 2025 आहे.

उमेदवारांनी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरणे गरजेचे आहे. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी  ITI  Admission Portal:https://admission.dvet.gov.in  या संकेतस्थळावर भेट द्यावी.

            आय.टी.आय. प्रवेशासाठी या संस्थेत, फॅशन टेक्नॉलॉजी, सुईग टेक्नॉलॉजी, कोपा, डीझेल, संधाता, पत्रेकारागीर, यंत्रकारागीर, कातारी, जोडारी, यांत्रीक विजक, प्रशितन व वातानुकूलित टेक्नीशियन, आरेखक स्थापत्य, यांत्रीक मोटार गाडी, विजतंत्री, तारतंत्री असे एकुण 15 व्यवसाय उपलब्ध आहेत. महिलासाठी प्रत्येक व्यवसायात 30 टक्के जागा राखीव आहेत व अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळावर भेट द्यावी व जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रवेश अर्ज भरावेत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरतांना काही अडचण आल्यास संस्थेतील प्रवेश विभागास संपर्क साधावा, असे आवाहन रजनी शेळके प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

-*-*-*-*-*- 

No comments:

Post a Comment