जालना दि.27 (जिमाका) : राजर्षी
शाहू महाराज जयंती पर्वच्या अनुषंगाने दि. 26 जुन ते 4 जुलै 2025 या कालावधीत राज्यातील अकरावी व बारावी विज्ञान
शाखेतील मागासवगीय विज्ञान शाखेतील सर्व मागासवगीय विद्यार्थ्यांना जात वैधता
प्रमाणत्र मिळण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती जालना मार्फत विशेष
मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष मोहिमेनिमित्त दि. 26 जुन
2025 रोजी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने 163 विद्यार्थ्यांना जात वैधता
प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सीईटी तसेच इयत्ता अकरावी,
बारावी विज्ञान शाखेतील 2025-26 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना
जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. अर्जदारांची
प्रकरणे त्रुटी पुर्ततेअभावी समितीकडे प्रलंबित आहेत अशा अर्जदारांना लेखी पत्र व
ई-मेल व दुरध्वनीव्दारे त्रुटी पुर्ततेबाबत कळवूनही अर्जदारांनी अद्याप त्रुटीची
पुर्तता केलेली नाही अशा अर्जदारांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विशेष मोहिम
राबविण्यात येत आहे. असेही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment