जालना,दि.13 (जिमाका):- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल,
पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा
गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार,
दि. 14 जुन, 2025 रोजी दुपारी 12.40 वाजता महिको विश्रामगृह
जालना येथे आगमन व राखीव. दुपारी 1.15 वाजता महिको विश्रामगृह येथून जिल्हा पोलिस
अधिक्षक कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात
आगमन व नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता जिल्हा
पोलिस अधिक्षक कार्यालयातून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण,
दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जालना जिल्हा नियोजन समितीच्या
बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता जालना येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण
करतील.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment