Sunday, 22 June 2025

जालना येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 जालना, दि.२१ (जिमाका):- क्रीडा व युवक सेवासंचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारीकार्यालयाच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथील  क्रिकेटच्या टर्फ मैदानावर शनिवार दि. 21 जून 2025 रोजी सकाळी ६.३० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त योगासने प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करत योग दिन उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मनियार, शिक्षणाधिकारी मनोज कोल्हे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.राजेंद्र पाटील, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र गाडेकर,, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, आदि मान्यवर उपस्थित होते. योगगुरू मनोज लोणकर यांच्यासह सुनिता माटोळे, ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी उपस्थितांकडुन योगाचे मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिके करुन घेतली. योग दिनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हास्तर योग समिती,शिक्षणाधिकारी, क्रीडा भारती, जिल्हा योग संघटना, सार्वजनिक आरोग्य़ विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, विविध योग संघटना, जिल्हा स्काऊट गाईड, तंत्र निकेतन महाविद्यालय व जिल्हा एकविध क्रीडा संघटना, विविध क्रीडा मंडळे यांचे सहकार्य लाभले. योग प्रात्यक्षिकासाठी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, श्री.स.भु.प्रशाला, ऑक्सफर्ड हाय. स्वामीविवेकानंद हाय., संस्कार प्रबोधिनी, ज्ञानज्योत हाय., शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदि शाळा -महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीसहभाग नोंदविला. कार्यक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. _*_*_*_*_

No comments:

Post a Comment