Wednesday, 4 June 2025

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रासाठी प्रस्ताव सादर करावेत

 


 

जालना, दि.4 (जिमाका) :- कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील तळागळातील सर्व घटकांपर्यंत पोहचावा व युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होऊन ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर कमी व्हावे, याकरीता स्वतंत्र प्रशिक्षण भागीदार नियुक्त करण्यासाठी संभाव्य संस्थाकडून अर्ज मागविले आहेत.     स्वतंत्र प्रशिक्षण भागीदार यांनी जालना तालुक्यातील सेवली आणि देवमूर्ती. मंठा तालुक्यातील तळनी, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी व धावडा, परतूर तालुक्यातील आष्टी आणि सातोना,  जाफ्राबाद तालुक्यातील टेंभूर्णी, बदनापूर तालुक्यातील दाभाडी या केंद्रांसाठी दि. 5 ते  12 जुन 2025 पर्यंत https://tinyurl.com/j5wbve6z या लिंकवरून प्रस्ताव डानलोड करून दोन प्रतीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जालना, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment