जालना दि.27 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्पस बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि. 26 जून, 2025 रोजी रोजी कला,
विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर
येथे ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय
रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 173 उमेदवारांची विविध उद्योजकांनी नोकरीसाठी निवड केली.
रोजगार मेळाव्यामध्ये विविध उद्योजकांनी 1 हजार 87 रिक्त पदे अधिसुचित केली होती. या अनुषंगाने रोजगार मेळाव्यास
569 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 173 उमेदवारांची विविध उद्योजकांनी नोकरीसाठी
निवड केली. यामध्ये एल.जी. बी. प्रा.लि.जालना 7
पदे,
विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. जालना 10 पदे, एन. आर.बी. बेअरींग प्रा.लि. 20 पदे, भुमि कॅाटेक्स इंडस्ट्री प्रा.लि. जालना 10 पदे, देवअश्व होंडा शोरूम जालना 5 पदे, सलाम किसान अॅण्ड
प्राईम अक्रोस्पेस प्रा.लि. जालना 6 पदे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर 15 पदे, डिस्टील एज्युकेशन अॅण्ड टेक्नॅालॉजी
प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर 20 पदे, डायनामिक ट्रान्समिशन प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर 13 पदे, फुलंब्री
टेक्स. कॉम. प्रा.लि. जालना 10
पदे,
बीव्हीजी इंडिया प्रा. लि.पुणे 19 पदे, प्रभात सीटीई छत्रपती संभाजीनगर 30 पदे, वैभव इंटरप्राईजेस प्रा. लि. 5 पदे असे एकुण 173 उमेदवारांची निवड करण्यात झाली. निवडीमध्ये 162 पुरूष व 11 महिलांचा समावेश आहे. रोजगार मेळाव्याच्या
यशस्वीतेसाठी उपायुक्त विद्या शितोळे, सहायक आयुक्त गणेश चिमणकर, भुजंग रिठे, अमोल
बोरकर, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, प्रदीप डोळे, अक्रुर अटकळ, रवी पाडमुख, विशाल
जगरवाल, उमेश कोल्हे, दिनेश उढाण, अमर तुपे, दीपक पालवे यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment