Tuesday, 12 November 2024

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहीत करावे - निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024


 जालना, दि.8 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या पार्श्वभूमीवर  सर्व उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे, अशी सूचना निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र  यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी ते बोलत  होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्यासह नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

निवडणूक निरीक्षक श्री. मिश्र म्हणाले की, उमेदवारांनी बँकेत निवडणूकीसाठी उघडलेल्या खात्यातूनच पैशाचा व्यवहार करावा. 10 हजार रुपये रक्कमेपेक्षा जास्तीचा व्यवहार धनादेशाद्वारे करण्यात यावा. तसेच खर्चाची दैनंदिन नोंदवही अद्यावत ठेवावी. मतदार यादी जाहिर करण्यात आली असून केवळ निवडणूक ओळखपत्र असेल आणि मतदार यादीत नाव नसेल तर अशा मतदारास मतदान करता येणार नाही. काही अडचण, शंका असल्यास उमेदवारांना सकाळी 9 ते 10 या वेळेत शासकीय विश्रामगृहातील हिमालय कक्षात मला प्रत्यक्ष भेटता येईल. असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिव्यांग व वयोवृध्द मतदाराचे गृह मतदान, उमेदवारांना ठेवावयाचा दैनंदिन खर्चाचा हिशोब, आचारसंहितेचे पालन, पोस्टल बॅलेट, विधानसभानिहाय लागणारे  ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बॅलेट युनिट, मतदान यंत्राचे रॅण्डमायझेशन, मतदानादिवशी मतदारांना मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सुविधा आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार स्ट्राँगरुमची सुरक्षा आदीबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्या शंकाचे  समाधान करण्यात आले.

-*-*-*-*-

 

वृत्त क्र.615                                                      दि. 8 नोव्हेंबर, 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र

 यांनी केली मतदान केंद्राची पाहणी

 

 जालना, दि.8 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक  निवडणूक- 2024 च्या पार्श्वभूमीवर  भोकरदन तालुक्यातील 8 मतदान केंद्रास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. मतदान केंद्र रॅम्पची दुरुस्ती, मतदान केंद्र खोलीच्या दरवाज्यांची सुरक्षा, प्रकाशासाठी विजेवरील उपकरणांची व्यवस्था, मतदारांना शुध्द पिण्याचे पाणी  व स्वच्छता गृहाची व्यवस्था, मतदारांसाठी मार्गदर्शक फलक लावण्याबाबतच्या सूचना निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र यांनी संबंधितांना केल्या.

भोकरदन तालुक्यातील राजुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोकरदन जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा, जयदेववाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वालसावंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारध (बु) जनता हायस्कुल, पिंपळगाव रेणूकाई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जळगाव सपकाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आन्वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी समन्वय अधिकारी तथा अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, गटविकास अधिकारी श्री. सुरडकर, श्री. शहागडकर यांच्यासह संबंधित अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024


§ निवडणुकीच्या राजकीय जाहिरात प्रसारीत / प्रसिद्धीसाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक

§ मुद्रीत माध्यमाद्वारे मतदान आणि मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्वप्रमाणीकरण करणे आवश्यक

 

 

जालना, दि.09 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. जालना जिल्हा विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम कक्षातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पांचाळ यांनी केले आहे.

राष्ट्रीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या तीन दिवस अगोदर जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अर्थात एम.सी.एम.सी. समिती ही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज 48 तासात निकाली काढेल. जाहिरात नियमानुसार नसल्याचे समितीला आढळून आल्यास एम.सी.एम.सी. समितीला जाहिरात प्रमाणिकरण नाकारण्याचा अधिकार आहे. समितीच्या निर्णया विरुद्ध राज्य समितीकडे अपील करता येते. मात्र त्यानंतर केवळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या तीन दिवस अगोदर जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जाहिरात नियमानुसार नसल्याचे समितीला आढळून आल्यास एम.सी.एम.सी. समितीला जाहिरात प्रमाणिकरण नाकारण्याचा अधिकार आहे. समितीच्या निर्णया विरुद्ध राज्य समितीकडे अपील करता येते. मात्र त्यानंतर केवळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे. जाहिरात प्रमाणीकरणासाठीचा अर्ज हा विहित नमुन्यात समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव व पत्ता, उमेदवार किंवा पक्षाचे नाव किंवा सदर जाहिरात एखादी संस्था - ट्रस्ट- संघटना यांच्याकडून दिली जात असल्यास त्यांचे नाव, मतदारसंघाचे नाव, राजकीय पक्षाचे मुख्यालयाचा पत्ता, ज्या चॅनल / केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करायची आहे, त्याबाबत स्पष्ट माहिती कोणत्या उमेदवाराच्या हितासाठी सदर जाहिरात करण्यात आली आहे, त्याबाबत माहिती, जाहिरात सादर करण्यात येत असल्याची दिनांक, जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली भाषा, त्याच्या संहिता लेखनाच्या (ट्रास्कींनप) साक्षांकित दोन प्रती, जाहिरातीचे शिर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरात जर चॅनेलद्वारे प्रसारित केली जात असेल तर किती वेळा ती प्रसारित केली जाणार आहे, त्याचे प्रस्तावित केलेले दर, त्यासाठी लागलेला एकूण खर्च आदी सविस्तर माहिती अर्जदाराने निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमून्यात स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेनुसार दिलेल्या निर्देशाचे जाहिरातीमध्ये पालन होणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी, धार्मिक भावना दुखावणे, भारतीय घटनेचा अवमान करणे, गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण, महिलांचे चुकीचे चित्रण, तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाच्या जाहिराती, हुंडा, बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. इतर देशावर टिका नसावी. न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये. राष्ट्रपती व न्याय संस्था यांच्याबाबत साशंकता नसावी. राष्ट्रीय एकात्मतेला, सौहार्दतेला आणि एकतेला बाधा पोहचविणारा मजकूर त्यामध्ये नसावा. सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक, व्यक्ती, अधिकारी यांची अथवा सैन्य दलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे. कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी / वैयक्तिक जीवनातील घटनांना धरुन त्यावर भाष्य नसावे. व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचारासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. या वाहनाची निवडणूक विभागाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या संमती शिवाय प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत. अनुमती शिवाय जाहिराती प्रकाशित झाल्यास प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर मुद्रीत माध्यमाद्वारे प्रकाशित करावयाची जाहिरात प्रमाणीकरणसाठी समितीकडे दोन दिवस आधी जाहिरातीसह अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा समिती अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविलेआहे.

-*-*-*-*-

विधानसभा मतदारसंघासाठी मतदान यंत्राची पहिली पुरवणी सरमिसळ

 

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024


जालना, दि.9 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या चार विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार मतदान यंत्राची पहिली पुरवणी सरमिसळ (सप्लिमेंटरी रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण  पांचाळ यांच्या उपस्थितीत शनिवार दि.9 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता पार पडली.

यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रविंद्र पडूळकर यांची उपस्थिती होती.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारांच्या संख्येनूसार बॅलेट युनिटची संख्या वाढली आहे. यात 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास 2 बॅलेट युनिट तर 32 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने 3 बॅलेट युनिट लागणार आहेत. यामध्ये 99-परतूर विधानसभा मतदार संघ वगळता 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघात 23 उमेदवार असल्याने 424 बॅलेट युनिट, 9 अतिरिक्त कंट्रोल युनिट आणि 9 अतिरिक्त व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले. तर 101-जालना विधानसभा मतदार संघात 26 उमेदवार असल्याने 402 बॅलेट युनिट, 9 अतिरिक्त कंट्रोल युनिट आणि 9 अतिरिक्त व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले. तसेच 102- बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदार संघात 17 उमेदवार असून 447 बॅलेट युनिट, 11 अतिरिक्त कंट्रोल युनिट आणि  10 अतिरिक्त व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले. आणि 103-भोकरदन विधानसभा मतदार संघात 32 उमेदवार असल्याने 800 बॅलेट युनिट, 9 अतिरिक्त कंट्रोल युनिट आणि 9 अतिरिक्त व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले. भोकरदन विधानसभा मतदार संघात नोटा वगळता 32 उमेदवार असल्याने त्याठिकाणी 3 बॅलेट युनिट लागणार आहेत. आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारांच्या प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या मतदान यंत्राची सरमिसळ प्रक्रियेनूसार जालना जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात कोणत्या क्रमांकाचे ईव्हीएम यंत्र कोणत्या केंद्रावर जाणार याची निश्चिती झाली आहे.

-*-*-*-*-

 

मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत दक्ष रहावे -निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र

 



 

 जालना,दि.10 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑर्ब्जव्हर्स) हे भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी असल्याने निवडणूक प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आपले काम निरीक्षण करण्याचे आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत दक्ष रहावे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या नूतन सभागृहात दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झालेल्या सुक्ष्म निरीक्षकांच्या दुसऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना निवडणूक निरीक्षक श्री. मिश्र हे बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. नवीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, प्रशिक्षणार्थी आयएएस श्री.अरुण, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक निरीक्षक श्री.मिश्र म्हणाले की, मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोलींग (अभिरुप मतदान) मतदान प्रक्रियेपासून ते सायंकाळी मतदान संपेपर्यत घडणाऱ्या सर्व घटनांचे अवलोकन करुन त्या माहितीचा अहवाल निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे वेळेत सादर करणे आवश्यक आहे. असे सांगत त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या नियमाबाबत सर्व सूक्ष्म निरीक्षकांना अवगत केले.

निवडणूक निरीक्षक श्री.नवीन म्हणाले की, सूक्ष्म निरीक्षकाचे काम हे अत्यंत संवेदनशील आहे. सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवावे. मतदान केंद्रात प्रवेश करताना मतदारांना मोबाईलसह प्रवेश देणे टाळावे. मतदान केंद्रात कोणत्याही स्वरूपाचा व्हिडिओ किंवा छायाचित्र काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करणे चुकीचे आहे. त्यामुळे याबाबत सूक्ष्म निरीक्षकांनी दक्षता घ्यावी, असेही सांगितले.

मॉकपोल मतदानाच्या दिवशी पक्षांचे मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पाडावी व त्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. असे सांगून मतदानासाठी इव्हीएम यंत्र तयार करणे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अभिरुप मतदानाची पद्धत, मतदान यंत्राबाबत करावयाची कार्यवाही अचूकरित्या होत असल्याचे निरीक्षण करावे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले सुक्ष्म निरीक्षकांनी कामे जबाबदारीने पार पाडावी. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.पांचाळ यांनी दिले.

निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांनी करावयाच्या कामकाजाबाबत माहिती देत सूक्ष्म निरीक्षकांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर होणारी कामकाज प्रक्रिया, तेथील अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

_*_*_*_*_

 

मुद्रीत माध्यमाद्वारे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवसपुर्वी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व-प्रमाणिकरण करणे आवश्यक

 


 

जालना, दि.11 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. जालना जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे आहेत.

मुद्रीत माध्यमाद्वारे निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवसपुर्वी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व-प्रमाणिकरण करणे आवश्यक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने दि. 19 आणि 20 नोव्हेंबर, 2024 रोजी उमेदवारांना वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती माध्यम पूर्व-प्रमाणन समितीकडून (MCMC) पुर्व-प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. पुर्व-प्रमाणीकरणासाठी समितीकडे 2 दिवस आधी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पुर्व-प्रमाणिकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी मुद्रीत माध्यमात मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवसपुर्वी प्रसिद्ध करावयाच्या आपल्या जाहिरातींचे पुर्व-प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पांचाळ यांनी केले आहे.

****

 

खर्च निवडणूक निरीक्षक देवप्रकाश बमणावत यांनी केली उमेदवारांच्या खर्च लेख्यांची प्रथम तपासणी

 


जालना, दि.11 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील खर्च तपासणीसाठी खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून देवप्रकाश बमनावत (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी जालना येथील तहसील कार्यालयात खर्च निवडणूक निरीक्षक देवप्रकाश बमनावत यांनी केली.

उमेदवाराच्या प्रचाराच्या कालावधीत किमान तीन वेळा प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करण्यात येत असते. उमेदवारांना व्यक्तीशः किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे. 99-परतूर, 100-घनसावंगी, 103- भोकरदन, 102-बदनापूर व 101-जालना विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली. विधानसभा निवडणुक प्रक्रियेमधील प्रत्येक तपासणीनंतर उमेदवाराच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीच्या तारखेपर्यंत स्कॅन करण्यात येऊन निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे. राज्य विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारास ज्या तारखेस तो नामनिर्देशित झाला होता ती तारीख व निवडणुकीच्या निकाल घोषित झाल्याची तारीख या दोन्ही तारखांसह या दरम्यान त्याने केलेल्या किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेल्या खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा (हिशेब) ठेवणे अनिवार्य आहे. उक्त मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च करणे किंवा प्राधिकृत करणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 123 (6) च्या संदर्भात भ्रष्ट आचारण आहे. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील प्रथम तपासणीच्या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी (खर्च) राजु सोळुंके यांच्यासह सहाय्यक खर्च निरीक्षक व लेखांकन चमुमधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक खर्च व्यवस्थापन समितीने  जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च लेख्यांची प्रथम तपासणीची माहिती खालीलप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहे.

-*-*-*-*-

 

 

 

Tuesday, 5 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ § निवडणुकीच्या राजकीय जाहिरात प्रसारीत / प्रसिद्धीसाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक § नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने जाहिरात प्रसारणाच्या तीन दिवसपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक § अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने 7 दिवस आधी अर्ज करणे आवश्यक § मुद्रीत माध्यमाद्वारे मतदान आणि मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्वप्रमाणीकरण करणे आवश्यक

 


 

     जालना, दि.05 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. जालना जिल्हा विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा समिती अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती या कक्षात कार्यान्वीत करण्यात आली आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम कक्षातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पांचाळ यांनी केले.

            राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत भारत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केलेली आहे. या नियमावली नुसार राजकीय पक्ष व उमेदवारांना दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्त वाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती,  बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हॉईस संदेश, सोशल मिडिया, इंटरनेट संकेतस्थळावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती ह्या देखील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्वप्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे.

            राष्ट्रीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या तीन दिवस अगोदर जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. जाहिरात नियमानुसार नसल्याचे समितीला आढळून आल्यास एम.सी.एम.सी. समितीला जाहिरात प्रमाणिकरण नाकारण्याचा अधिकार आहे. समितीच्या निर्णया विरुद्ध राज्य समितीकडे अपील करता येते. मात्र त्यानंतर केवळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे.

                 जाहिरात प्रमाणीकरणासाठीचा अर्ज हा विहित नमुन्यात समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव व पत्ता, उमेदवार किंवा पक्षाचे नाव किंवा सदर जाहिरात एखादी संस्था - ट्रस्ट- संघटना यांच्याकडून दिली जात असल्यास त्यांचे नाव, मतदारसंघाचे नाव, राजकीय पक्षाचे मुख्यालयाचा पत्ता, ज्या चॅनल / केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करायची आहे, त्याबाबत स्पष्ट माहिती कोणत्या उमेदवाराच्या हितासाठी सदर जाहिरात करण्यात आली आहे, त्याबाबत माहिती, जाहिरात सादर करण्यात येत असल्याची दिनांक, जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली भाषा, त्याच्या संहिता लेखनाच्या (ट्रास्‍कींप) साक्षांकित दोन प्रती, जाहिरातीचे शिर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरात जर चॅनेलद्वारे प्रसारित केली जात असेल तर किती वेळा ती प्रसारित केली जाणार आहे, त्याचे प्रस्तावित केलेले दर, त्यासाठी लागलेला एकूण खर्च आदी सविस्तर माहिती अर्जदाराने निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमून्यात स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे.

            आदर्श आचारसंहितेनुसार दिलेल्या निर्देशाचे जाहिरातीमध्ये पालन होणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी, धार्मिक भावना दुखावणे, भारतीय घटनेचा अवमान करणे,  गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण, महिलांचे चुकीचे चित्रण, तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाच्या जाहिराती,  हुंडा, बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. इतर देशावर टिका नसावी. न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये. राष्ट्रपती व न्याय संस्था यांच्याबाबत साशंकता नसावी. राष्ट्रीय एकात्मतेला, सौहार्दतेला आणि एकतेला बाधा पोहचविणारा मजकूर त्यामध्ये नसावा. सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक, व्यक्ती, अधिकारी यांची अथवा सैन्य दलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे. कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी / वैयक्तिक जीवनातील घटनांना धरुन त्यावर भाष्य नसावे. व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचारासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या जाहिराती माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. या वाहनाची निवडणूक विभागाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे.

            एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या संमती शिवाय प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत. अनुमती शिवाय जाहिराती प्रकाशित झाल्यास प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर मुद्रीत माध्यमाद्वारे प्रकाशित करावयाची जाहिरात प्रमाणीकरणसाठी समितीकडे दोन दिवस आधी जाहिरातीसह अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा समिती अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.

 

****