विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
जालना, दि.9 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना,
102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या चार विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर,
2024 रोजी मतदान होणार आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार मतदान यंत्राची पहिली पुरवणी सरमिसळ (सप्लिमेंटरी
रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत शनिवार दि.9 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी
10 वाजता पार पडली.
यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह उपजिल्हा निवडणूक
अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना व विज्ञान
अधिकारी रविंद्र पडूळकर यांची उपस्थिती होती.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारांच्या संख्येनूसार बॅलेट
युनिटची संख्या वाढली आहे. यात 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास 2 बॅलेट युनिट तर
32 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने 3 बॅलेट युनिट लागणार आहेत. यामध्ये 99-परतूर
विधानसभा मतदार संघ वगळता 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघात 23 उमेदवार असल्याने 424
बॅलेट युनिट, 9 अतिरिक्त कंट्रोल युनिट आणि 9 अतिरिक्त व्हीव्हीपॅट वाटप करण्यात
आले. तर 101-जालना विधानसभा मतदार संघात 26 उमेदवार असल्याने 402 बॅलेट युनिट, 9 अतिरिक्त
कंट्रोल युनिट आणि 9 अतिरिक्त व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले. तसेच 102- बदनापूर
(अ.जा.) विधानसभा मतदार संघात 17 उमेदवार असून 447 बॅलेट युनिट, 11 अतिरिक्त
कंट्रोल युनिट आणि 10 अतिरिक्त
व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले. आणि 103-भोकरदन विधानसभा मतदार संघात 32 उमेदवार असल्याने
800 बॅलेट युनिट, 9 अतिरिक्त कंट्रोल युनिट आणि 9 अतिरिक्त व्हीव्हीपॅट वाटप
करण्यात आले. भोकरदन विधानसभा मतदार संघात नोटा वगळता 32 उमेदवार असल्याने त्याठिकाणी
3 बॅलेट युनिट लागणार आहेत. आज राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवारांच्या
प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या मतदान यंत्राची सरमिसळ प्रक्रियेनूसार जालना जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात
कोणत्या क्रमांकाचे ईव्हीएम यंत्र कोणत्या केंद्रावर जाणार याची निश्चिती झाली आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment