Saturday, 23 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 101-जालना विधानसभा मतदार संघातून अर्जुन पंडीतराव खोतकर विजयी

 



जालना, (जिमाका)दि.23: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 101-जालना मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 101-जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार अर्जुन पंडीतराव खोतकर यांना 1,04,654 मते मिळाली. तर इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे उमेदवार कैलास किसनराव गोरंट्याल यांना 76,014 इतकी मते मिळाली. यात शिवसेना पक्षाचे उमेदवार अर्जुन पंडीतराव खोतकर हे 31,651 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी अर्जुन पंडीतराव खोतकर यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवडणूक निरिक्षक श्री. वेद पती मिश्र, निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हारकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी छाया पवार यांची उपस्थिती होती.

101-जालना विधानसभा मतदारसंघातून एकुण 26 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते  प्राप्त झाली आहेत.

 

.क्र.

उमेदवारांचे नांव

पक्ष

मिळालेली मते

1

अर्जुन पंडीतराव खोतकर

शिवसेना

1,04,665

2

किशोर यादव बोरुडे

बहुजन समाज पार्टी

900

3

कैलास किसनराव गोरंट्याल

इंडियन नॅशनल काँग्रेस

73,014

4

असद उल्ला शेख अमान उल्ला शहा-

सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया

869

5

डेव्हीड प्रल्हादराव घुमारे

वंचीत बहुजन आघाडी

6,322

6

निला गौतम काकडे

विकास इंडिया पार्टी

131

7

मिलींद बालू बोर्डे

बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पार्टी

363

8

ॲड. योगेश दत्तु गुल्लापेल्ली

ऑल इंडिया फॅारवर्ड ब्लॉक

92

9

विकास छगन लहाने

पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डे.)

149

10

विजय पंडितराव वाडेकर

संभाजी ब्रिगेड पार्टी

131

11

विनोद राजाभाऊ मावकर

राष्ट्रीय समाज पक्ष

98

12

अनवर कुरेशी सलीम कुरेशी

अपक्ष

108

13

अनिस शमशोद्यीन सय्य्द

अपक्ष

157

14

अफसर फरीद शेख चौधरी

अपक्ष

528

15

अब्दुल हफीज अब्दुल गफार

अपक्ष

30,454

16

अर्जुन दादा पाटील भांदरगे

अपक्ष

985

17

अर्जुन सुभाष कणिसे

अपक्ष

688

18

अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहर पांगारकर

अपक्ष 

2,227

19

आनंदा लिंबाजी ठोबरे

अपक्ष 

270

20

कुंडलिक विठ्ठल वखरे

अपक्ष

118

21

गणेश दादाराव कावळे

अपक्ष

108

22

योगेश सखाराम कदम

अपक्ष

103

23

रतन आसाराम लांडगे

अपक्ष

51

24

विशाल लक्ष्मण हिवाळे 

अपक्ष

123

25

सपना विनोद सुरडकर

अपक्ष

101

26

ॲड. संजय रघुनाथ रौंदळे

अपक्ष

372

27

नोटा

813

 

****

No comments:

Post a Comment