Saturday, 23 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघातून उढाण हिकमत बळीराम विजयी

 



 

जालना, (जिमाका)दि.23: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 100-घनसावंगी मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घनसावंगी येथे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांनी मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर केला. 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार उढाण हिकमत बळीराम यांना 98,496 मते मिळाली. तसेच नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेशभैय्या टोपे यांना 96,187 इतकी मते मिळाली. यात शिवसेना पक्षाचे उमेदवार उढाण हिकमत बळीराम हे 2,309 मतांनी विजयी झाल्याचे घोषीत करुन निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे यांनी उढाण हिकमत बळीराम यांना निवडणूक प्रमाणपत्र देवून त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी निवडणूक निरिक्षक निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी योगिता खटावकर यांची उपस्थिती होती.

100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून एकुण 23 उमेदवार निवडणूकीत सहभागी झाले होते. या सर्व उमेदवारांना खालील प्रमाणे मते  प्राप्त झाली आहेत.

 

.क्र.

उमेदवारांचे नांव

पक्ष

मिळालेली मते

1

उढाण हिकमत बळीराम

शिवसेना

98,496

2

जायभाये दिनकर बाबुराव

बहुजन समाज पार्टी

874

3

राजेशभैय्या टोपे

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

96,187

4

कावेरी बळीराम खटके

वंचित बहुजन आघाडी

20,731

5

बाबासाहेब संतुकराव शेळके

समता पार्टी

4,830

6

रमेश मारोतराव वाघ

राष्ट्रीय समाज पक्ष

217

7

विलास महादेव वाघमारे

ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक

109

8

शाम कचरु साळवे

बहुजन भारत पार्टी

554

9

आप्पा आन्ना झाकणे

अपक्ष

183

10

उगले गजानन रामनाथ

अपक्ष

142

11

उढाण सतिश गणपतराव

अपक्ष

288

12

घाटगे सतिश जगन्नाथराव

अपक्ष

23,696

13

चोथे शिवाजी कुंडलीकराव

अपक्ष

2,324

14

दिनकर उघडे

अपक्ष

1,785

15

निसार पटेल

अपक्ष

654

16

पवार ज्ञानेश्वर प्रतापराव

अपक्ष

828

17

बाबासाहेब पाटील शिंदे

अपक्ष

1,090

18

ॲड भास्कर बन्सी मगरे

अपक्ष

259

19

राजेंद्र बबनराव कुरणकर

अपक्ष

1,088

20

रामदास आश्रुबा तौर

अपक्ष

1,042

21

विलास आसाराम कोल्हे

अपक्ष

144

22

श्रीहरी यादवराव जगताप

अपक्ष

151

23

सतिश मधूकर घाडगे

अपक्ष

131

24

नोटा

486

 

****

No comments:

Post a Comment