जालना, दि.11 (जिमाका) :-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय
जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. जालना जिल्ह्यात
विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण आणि सनियंत्रण समितीची
स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे आहेत.
मुद्रीत
माध्यमाद्वारे निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे मतदानाच्या दिवशी आणि
मतदानाच्या एक दिवसपुर्वी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे पूर्व-प्रमाणिकरण करणे
आवश्यक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा
मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने दि. 19
आणि 20 नोव्हेंबर, 2024 रोजी उमेदवारांना वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती
माध्यम पूर्व-प्रमाणन समितीकडून (MCMC) पुर्व-प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे.
पुर्व-प्रमाणीकरणासाठी समितीकडे 2 दिवस आधी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
पुर्व-प्रमाणिकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात
आला आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी मुद्रीत माध्यमात मतदानाच्या दिवशी आणि
मतदानाच्या एक दिवसपुर्वी प्रसिद्ध करावयाच्या आपल्या जाहिरातींचे
पुर्व-प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत जिल्हास्तरीय माध्यम
प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पांचाळ यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment