Thursday, 21 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी राजीव रंजन यांची निवडणूक निरिक्षक (मतमोजणी) म्हणुन नियुक्ती

 


जालना, दि.21 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने राजीव रंजन यांची निवडणूक निरिक्षक (मतमोजणी) यांची नियुक्ती केली आहे.

 102-बदनापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार, उमेदवार यांचे प्रतिनिधी व मतदार यांना मतमोजणी विषयक काही शंका असल्यास शुक्रवार, दि. 22 नोव्हेंबर, रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत कृषि महाविद्यालय, बदनापूर येथे उपस्थित राहून निवडणूक निरिक्षक (मतमोजणी) राजीव रंजन यांचे समक्ष शंकाचे निराकरण करुन घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सरिता सुत्रावे यांनी कळविले आहे.  

****

No comments:

Post a Comment