जालना,
दि. 21 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
करीता जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नाव्हेंबर, 2024
रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक-2019 च्या तुलनेत काल पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
करीता जालना जिल्ह्यात 5.6 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली असून, विधानसभा मतदानाच्या
टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक-2019 मध्ये 67.07 टक्के मतदान झाले होते. तर काल पार पडलेल्या विधानसभा
सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये 72.67 टक्के मतदान झाले आहे. यानुसार 2019 च्या
तुलनेत 2024 मध्ये 5.6 टक्क्यांनी मतदान
वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात 70 टक्के तर 2 विधानसभा
मतदारसंघात 75 टक्याहून अधिक मतदान झाले आहे.
काल पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक
निवडणूक-2024 च्या मतदानाच्या टक्केवारीत राज्यातील पश्चिमेकडील कोल्हापूर जिल्हा
प्रथम तर पूर्वेकडील गडचिरोली जिल्हा दूसऱ्या क्रमांकावर तर राज्यातील मध्य
भागातील जालना जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
****
No comments:
Post a Comment