Tuesday, 12 November 2024

खर्च निवडणूक निरीक्षक देवप्रकाश बमणावत यांनी केली उमेदवारांच्या खर्च लेख्यांची प्रथम तपासणी

 


जालना, दि.11 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील खर्च तपासणीसाठी खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून देवप्रकाश बमनावत (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केलेली आहे. उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी जालना येथील तहसील कार्यालयात खर्च निवडणूक निरीक्षक देवप्रकाश बमनावत यांनी केली.

उमेदवाराच्या प्रचाराच्या कालावधीत किमान तीन वेळा प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करण्यात येत असते. उमेदवारांना व्यक्तीशः किंवा आपल्या निवडणूक प्रतिनिधीमार्फत नोंदवही सादर करणे आवश्यक आहे. 99-परतूर, 100-घनसावंगी, 103- भोकरदन, 102-बदनापूर व 101-जालना विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात आली. विधानसभा निवडणुक प्रक्रियेमधील प्रत्येक तपासणीनंतर उमेदवाराच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंदवही तपासणीच्या तारखेपर्यंत स्कॅन करण्यात येऊन निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहे. राज्य विधानसभेच्या प्रत्येक उमेदवारास ज्या तारखेस तो नामनिर्देशित झाला होता ती तारीख व निवडणुकीच्या निकाल घोषित झाल्याची तारीख या दोन्ही तारखांसह या दरम्यान त्याने केलेल्या किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेल्या खर्चाचा स्वतंत्र व अचूक लेखा (हिशेब) ठेवणे अनिवार्य आहे. उक्त मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खर्च करणे किंवा प्राधिकृत करणे हे लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 123 (6) च्या संदर्भात भ्रष्ट आचारण आहे. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील प्रथम तपासणीच्या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा नोडल अधिकारी (खर्च) राजु सोळुंके यांच्यासह सहाय्यक खर्च निरीक्षक व लेखांकन चमुमधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक खर्च व्यवस्थापन समितीने  जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च लेख्यांची प्रथम तपासणीची माहिती खालीलप्रमाणे उपलब्ध करुन दिली आहे.

-*-*-*-*-

 

 

 

No comments:

Post a Comment