जालना, दि. 26
(जिमाका): जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे पहिल्या सोमवारी
करण्याबाबत निर्देश आहेत. जिल्ह्यात दि. 2
डिसेंबर, 2024 सोमवार रोजी सकाळी ठिक 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15
दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देतांना त्यांनी
संबंधित तालूक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला
असावा. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन
देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह
विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा. तसेच ज्या अर्जदाराने
तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही, अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी कळविले आहे. कोणत्याही स्तरावर लोकशाही दिनात
खालील बाबींशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणर नाहीत. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व,
अपील, सेवाविषयक आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक
त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन
क्रमांकाशी तसलीदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदती व
नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार
मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला
आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये.
तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज http:jalna.mic.in या
संकेस्थळावर उपलब्ध असल्याचे उपजिल्हाधिकारी (सामान्य) नम्रता चाटे यांनी कळविले
आहे.
|
**** |
|
3571 |
No comments:
Post a Comment