विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
जालना, दि.8 (जिमाका)
: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवारांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे.
तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असून राजकीय
पक्षांच्या प्रतिनिधींनीही मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व मतदारांना मतदान
करण्यास प्रोत्साहीत करावे, अशी सूचना निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र यांनी केली.
जिल्हाधिकारी
कार्यालयात नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेण्यात आली. याप्रसंगी
ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार,
उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक,
उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्यासह नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची
उपस्थिती होती.
निवडणूक
निरीक्षक श्री. मिश्र म्हणाले की, उमेदवारांनी बँकेत निवडणूकीसाठी उघडलेल्या
खात्यातूनच पैशाचा व्यवहार करावा. 10 हजार रुपये रक्कमेपेक्षा जास्तीचा व्यवहार
धनादेशाद्वारे करण्यात यावा. तसेच खर्चाची दैनंदिन नोंदवही अद्यावत ठेवावी. मतदार
यादी जाहिर करण्यात आली असून केवळ निवडणूक ओळखपत्र असेल आणि मतदार यादीत नाव नसेल
तर अशा मतदारास मतदान करता येणार नाही. काही अडचण, शंका असल्यास उमेदवारांना सकाळी
9 ते 10 या वेळेत शासकीय विश्रामगृहातील हिमालय कक्षात मला प्रत्यक्ष भेटता येईल.
असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत
जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिव्यांग व वयोवृध्द मतदाराचे गृह मतदान,
उमेदवारांना ठेवावयाचा दैनंदिन खर्चाचा हिशोब, आचारसंहितेचे पालन, पोस्टल बॅलेट, विधानसभानिहाय
लागणारे ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बॅलेट
युनिट, मतदान यंत्राचे रॅण्डमायझेशन, मतदानादिवशी मतदारांना मतदान केंद्रावर देण्यात
येणाऱ्या सुविधा आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार स्ट्राँगरुमची सुरक्षा
आदीबाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित
केलेल्या प्रश्नांची उत्तरे देवून त्यांच्या शंकाचे समाधान करण्यात आले.
-*-*-*-*-
वृत्त क्र.615 दि. 8 नोव्हेंबर, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024
निवडणूक
निरीक्षक वेद पती मिश्र
यांनी केली मतदान केंद्राची पाहणी
जालना, दि.8 (जिमाका)
: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-
2024 च्या पार्श्वभूमीवर भोकरदन
तालुक्यातील 8 मतदान केंद्रास प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. मतदान केंद्र
रॅम्पची दुरुस्ती, मतदान केंद्र खोलीच्या दरवाज्यांची सुरक्षा, प्रकाशासाठी
विजेवरील उपकरणांची व्यवस्था, मतदारांना शुध्द पिण्याचे पाणी व स्वच्छता गृहाची व्यवस्था, मतदारांसाठी
मार्गदर्शक फलक लावण्याबाबतच्या सूचना निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र यांनी संबंधितांना
केल्या.
भोकरदन
तालुक्यातील राजुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोकरदन जिल्हा परिषद केंद्रीय
कन्या शाळा, जयदेववाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वालसावंगी जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा, पारध (बु) जनता हायस्कुल, पिंपळगाव रेणूकाई जिल्हा परिषद प्राथमिक
शाळा, जळगाव सपकाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आन्वा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस
प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी समन्वय अधिकारी तथा अतिरीक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, गटविकास अधिकारी श्री. सुरडकर, श्री. शहागडकर
यांच्यासह संबंधित अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment