जलसंधारण व मृदसंधारणाच्या कामांना प्राधान्य; जालना जलकवच अभियान प्रभावीपणे
राबविण्याचे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांचे निर्देश
जालना,दि.7(जिमाका) : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कामाची मागणी
करणाऱ्या प्रत्येक मजुराला तात्काळ रोजगार उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी ग्रामपंचायतनिहाय
पुरेशी कामे मंजूर करून कामांचा ‘शेल्फ ऑफ प्रोजेक्ट्स’ तयार ठेवावा. तसेच जलसंधारण
व मृदसंधारणाची जास्तीत जास्त कामे हाती घेऊन मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध
करून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन भवनात (दि.6रोजी) जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका कृषी
अधिकारी, लागवड अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी तसेच व्ही.बी.जी. राम जी
अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीस मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कणवारिया, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण वेणीकर, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण)
सुरेश वडोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह संबंधित अधिकारी
उपस्थित होते.
ग्रामपंचायतनिहाय
मजुरांच्या कामाच्या मागणीचा विचार करून आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कामे मंजूर करावीत.
‘जालना जलकवच’ अभियानांतर्गत जलतारा, शोषखड्डे, छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे,
गाळ काढणे तसेच अन्य जलसंधारण व मृदसंधारणाची कामे प्राधान्याने सुरू करावीत, अशा सूचना
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
संभाव्य
पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जलसाठे निर्माण करणे, भूजलपातळी वाढविणे
आणि पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त संधारण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रभावी
नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यमान जलसाठ्यांमधील गाळ काढणे, आवश्यक दुरुस्ती
करून साठवण क्षमता वाढविणे तसेच संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर योजनेअंतर्गत
चारा लागवडीची कामे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
काम
मागणी करणाऱ्या सर्व मजुरांना विलंब न करता काम उपलब्ध करून देण्यासोबतच कामावर येणाऱ्या
मजुरांची ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले. ऑक्टोबर 2026 मध्ये
होणाऱ्या ग्रामसभांमध्ये अनुज्ञेय 375 कामांची माहिती नागरिकांसमोर प्रदर्शित करून
व्हीजीपीपी (Viksit Gram Panchayat Plan) आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कामांना प्राधान्यक्रम ठरविताना महिला, भूमिहीन मजूर, अल्पभूधारक आणि संवेदनशील वस्त्यांतील
नागरिकांचा सहभाग प्राधान्याने घ्यावा, असेही सांगण्यात आले.
प्राप्त
प्रस्ताव, ग्रामपंचायतीचा नकाशा, जल अंदाजपत्रकाचा आराखडा आणि प्रत्यक्ष स्थळ पडताळणीच्या
आधारे ग्रामसभा घेऊन कामांचे नियोजन करावे. आर्थिक वर्ष 2027-28 साठी व्हीजीपीपी आराखडा
2 ऑक्टोबर 2026 ते 15 जानेवारी 2027 या कालावधीत तयार करावा. 15 जानेवारीपूर्वी कामकाज
व मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून युक्तधारा मालमत्ता सूची, पीआरए, गॅप असेसमेंट आणि
जिओलोकेशन यांची सांगड घालत अपेक्षित मनुष्यदिवसांसह कामांचा सेल्फ तयार करून आराखडा
जिल्हा कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
व्हीबीजी
रामजी संकेतस्थळावर ‘Secure’ प्रणालीद्वारे कामांचे अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यपद्धती
तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामांचे मोजमाप घेण्यासाठी ई-मेजरमेंट (E-MB) नोंदणी करण्याबाबत
कार्यक्रम व्यवस्थापक एस. आर. देवढे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.
यावेळी
बैठकीत रोजगार हमी योजना, जलसंधारणाची कामे आणि आगामी नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
****




.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)












.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)