Tuesday, 30 September 2025

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन

 

 

जालना दि.30 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दि.7 ऑक्टोबर 2025  रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीस समितीवर नियुक्त शासकीय सदस्य व अशासकीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे. सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितासंबंधित तक्रारी असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर करावा. ग्राहकांच्या संबंधाने का ही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टलउपलब्ध करुन दिले असून आपल्या समस्या पोर्टलच्या माध्यमातून कळवाव्यात. असेही जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिक मेळावा

  

जालना दि.30 (जिमाका) :- भारतीय संविधानाच्या राज्य धोरणाची निदेशक तत्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. शासनाने 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना येथे बुधवार दि.1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नागरिकांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात राज्याचे सर्वसामावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-2013 ची अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. असे विशेष अधिकारी, समाज कल्याण कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

 


जालना दि.30 (जिमाका) :- खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षीत गटातील ब्राम्हण, बनिया, मारवाडी ठाकूर, गुजराती, यलमार, जाट, सिंधी, राजपुत, कोमटी, सेनगुणथर, त्यागी, पटेल, बंगाली, पाटीदार, नायडू, नायर, एयांगर, कायस्त, कामा, राजपुरोहित आदी समाजातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींसाठी जिल्ह्यात विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी केंद्र अमृत पुणे व उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जालना यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षीत गटातील उमेदवारांसाठी नि:शुल्क प्रशिक्षणाचे जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी घेण्याचे नियोजित आहे. यामध्ये अमृत क्षमता बांधणीचे 6 दिवसीय प्रशिक्षण, 18 दिवसीय अमृत निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम,  21 दिवसीय अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आणि एक महिन्याचे तांत्रिक अमृत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी आपले अर्ज आयोजक दिलीप शिलवंत मो. 8087283065 यांच्याशी  किंवा प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Saturday, 27 September 2025

दिपक बोऱ्हाडे यांची पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी घेतली भेट

 






जालना, दि.27(जिमाका): धनगर समाजाला एसटीचे आरक्षणाची मागणीसाठी जालना येथे आमरण उपोषणास बसलेले दिपक बोऱ्हाडे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ म्हणुन पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीबाबत विचारणा करुन उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली.

यावेळी आमदार सर्वश्री अर्जुनराव खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी याठिकाणी पालकमंत्री म्हणून आले आहे. दिपक बोऱ्हाडे यांची मागील तीन दिवसांपासून तब्येत खालावली असुन, त्यांनी धनगर समाजासाठी केलेल्या मागण्यांविषयी आमच्या मनात संवेदना आहेत. धनगर समाज या मागण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून लढा देत आहे. त्यामुळे शासन देखील तुमच्या मागण्याबाबत सकारात्मक असुन, तुमच्या न्यायासाठी लढणार आहे. परंतू हा प्रश्न चर्चेतून सोडता येईल याकरीता दिपक बोऱ्हाडे यांनी आपले उपोषण सोडून, आपले शिष्टमंडळ घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी मुंबईला यावे असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. सद्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबीत असून, हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी बैठका होत आहेत. यासाठी थोडा वेळ लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहात, यात शंका नाही. शासनाला देखील वाटते की हा प्रश्न आता सुटला पाहिजे परंतू काही कायद्याच्या अडचणी असल्याने याची आपणा सर्वांना कल्पना आहे. परंतू श्री. दिपक बोऱ्हाडे हे मागील 11 दिवसापासून उपोषण करत असून इतके दिवस उपोषण करणे योग्य नाही, त्याकरीता त्यांनी आपले उपोषण सोडावे. समाजाचा प्रश्न महत्वाचा असून हा प्रश्न सोडविण्यासाठी चर्चेची आवश्यता आहे. याकरीता श्री. बोऱ्हाडे यांनी चर्चेसाठी मुंबईला यावे आपण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासोबत बसून यावर चर्चा करु असे सांगितले.

यावेळी श्री. बोऱ्हाडे यांच्या प्राथमिक चर्चा झाल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे आणि गिरीष महाजन यांनी श्री. बोऱ्हाडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री. बोऱ्हाडे यांना शासन धनगर समाजाला आरक्षण देण्याकरीता सकारात्मक आहे. त्यासाठी प्रयत्न देखील करत आहे. परंतू एससी एसटी आरक्षण हे संवैधानिक आरक्षण असुन हा केंद्राचा विषय आहे. शासनाने आरक्षणाबाबत आपली बाजू मांडली आहे. परंतू सर्वोच्च न्यायालयामुळेही यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्याचे सांगुन, धनगर समाजला एसटीतून आरक्षण देण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया सांगितली. तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी जो पर्यंत चर्चा होणार नाही, तोपर्यंत मार्ग् निघणार नाही. याकरीता श्री. बोऱ्हाडे यांनी आपले उपोषण सोडून चर्चा करण्यासाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले.

-*-*-*-*-*-

30 सप्टेंबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन 519 रिक्त पदांसाठी भरती

 

 

जालना, दि.27 (जिमाका) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना अणि मातोश्री स्किल डेव्हलमेंट सेंटर, अंबड रोड, जालना यांचे संयुक्त विद्यामानाने दिनांक 30 सप्टेंबर, 2025मंगळवार रोजी मातोश्री स्किल डेव्हलमेंट सेंटर, अंबड रोड, जालना येथे सकाळी 10ते दुपारी 4 वाजेपर्यंत" पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात दहावी बारावी/आय.टी.आय/बी.ए./बी.कॉम बी.एस सी./एम. कॉन / डिप्लोमा इंजीनिअर / बी. ई. इंजीनिअर इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन डिप्लोमा व इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक महिला उमेदवारासाठी एकूण 519 रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 10 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या रोजगार मेळाव्यामध्ये मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर प्रा.लि. जालना यांची 4 पदे, पेटीएम सेर्विसेस प्रा.लि. जालना यांची 50पदे, आई इन्शुरन्स अँड इन्वेस्टमेंट सेर्विसेस यांची 48 पदे. भारत फाइनेंशियल सेर्विसेस लिमिटेड जालना यांची 66 पदे, टाटा मोटर्स लिमिटेड पुणे (By Quess Crop) यांची 100 पदे, बजाज ऑटो लिमिटेड छत्रपती संभाजीनगर (By Quess Crop) यांची 100 पदे, म्हस्के टेक्नोलॉजी प्रा. लि. बदनापूर जालना याची 6 पदे, धूत ट्रान्समिशन प्रा.लि. छ. संभाजीनगर (By Pariveda Advisory) यांची 20 पदे, रेडिको खेतान लिमिटेड छत्रपती संभाजीनगर (By Pariveda Advisory) यांची 20 पदे, युवशक्ती फाऊंडेशन (YSF) छ. संभाजीनगर यांची 105 पदे, अशी एकूण 519 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 10 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी प्रत्येक्ष उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

या सुवर्ण संधीचा रोजगार इच्छुक जिल्हातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि किमान पाच प्रतीत रिझ्युमे/बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह सकाळी वाजता 9 उपस्थित राहावे, नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच, या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर क्लिक करुन जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी अॅप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप क्रमांक02482-299033 वर संपर्क करावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गणेश चिमणकर, यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

 

जालना दि.27 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात ते  दि. 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑरेंज  (Orange) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 28  सप्टेंबर 2025 रोजी यलो (Yellow)  अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी मध्यम  स्वरुपाचा  व दि.30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2025 रोजी   हलका त मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

Friday, 26 September 2025

जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा भागात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी





 

जालना, दि.26 (जिमाका) : जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी आज जालना तालूक्यातील रोहनवाडी आणि पानशेंद्रा या गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली.

यावेळी श्री. सामंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन, या नैसर्गिक संकटाच्या वेळी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन, बाधीत शेतकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे व त्यांना न्याय मिळवून देण्याची आमची जबाबदारी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कृषिमंत्र्यांनी सगळ्या उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे करुन, शासनामार्फत नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचविण्यात येणार असल्याचेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार अर्जुन खोतकर, उपविभागीय अधिकारी श्री. दौड, तहसिलदार श्रीमती छाया पवार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह रोहनवाडी आणि पानशेंद्रा या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.

-*-*-*-*-*-


कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त शेतपिकांची केली पाहणी

 






         जालना, दि.26(जिमाका): जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा  यांनी आज बदनापूर तालूक्यातील शेलगाव या गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली. यावेळी श्री. लोढा म्हणाले की, शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने  झालेल्या नुकसानीनुसार योग्य पंचनामे करावे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत देण्यात येणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन, त्यांनी काळजी करू नये. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहचविण्यात येणार असल्याचेही श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार नारायण कुचे, उपविभागीय अधिकारी श्री. दौड, तहसिलदार, श्री. हेमंत तायडे, सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह शेलगाव येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

28 सप्टेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन

 


जालना दि.26 (जिमाका) : तहसिल  घनसावंगी  यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांच्या तातडीने निपटारा व्हावा तसेच नागरीकांना जलद न्याय मिळावा या उद्देशाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 महसुल सेवा पंधरवडा अंतर्गत न्याय आपल्या दारी या संकल्पनेतुन रविवार 28 सप्टेंबर  2025 रोजी  सकाळी 11.00 वाजता तहसिलदार तथा तालुका  दंडाधिकारी कार्यालय घनसावंगी येथे लोक अदालत आयोजित केली आहे.

लोक अदालतमध्ये तडजोड होऊ शकणाऱ्या महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे तरतुदीनुसार मामलदार कोर्ट ॲक्ट ( 15 च्या कलम 143, कुळकायदा दावे अंतर्गत अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये समेट/तडजोड  करायची असल्यास विहीत नमुन्यामध्ये अर्ज करण्यासाठी सर्व संबंधीत नागरीक शासकीय कार्यालये यांना याद्वारे सुचित करावे. तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की, अर्धन्यायीक प्रकरणांमध्ये तातडीने न्याय मिळवून घेण्यासाठी या लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपात्रांसह वेळेवर उपस्थित राहावे. अशी माहिती तहसिलदार घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-

 

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

जालना दि.26 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 26 सप्टेंबर  ते  दि. 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 29  सप्टेंबर 2025 रोजी मध्यम स्वरुपाचा  व दि.30 सप्टेंबर 2025 रोजी   हलका त मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

मॅजिक आयटीआय जालना इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना उद्योजक होण्याची संधी : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा § ‘मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर’ चे उद्घाटन

 





 

जालना, दि.26(जिमाका): जालना जिल्ह्यातील युवकांच्या उद्योग विषयक कल्पनेनुसार आपला स्वतंत्र उद्योग सुरु करुन उद्योजक होण्यासाठी मॅजिक इन्क्यूबेशन सेंटरच्या माध्यमातून सुवर्णसंधी निर्माण झाली असल्याचे राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

येथील हुतात्मा जनार्दनमामा नागापुरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात सुरु करण्यात आलेल्या मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी श्री. लोढा हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, कौशल्य विकास विभागाच्या विभागीय उपआयुक्त विद्या शितोळे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे सहसंचालक पुरूषोत्तम देवतळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर आणि शासकीय आयटीआयचे प्राचार्य प्रविणकुमार उखळीकर, मॅजिक संचालक मंडळाचे आशिष गर्दे, रितेश मिश्रा, नितीन काबरा, सुनील रायठ्ठा, प्रसाद कोकिळ, केदार देशपांडे, प्रशांत देशपांडे, मिलिंद कांक, सुरेश तोडकर तसेच मॅजिकची यंग टीमचे यशराज पिट्टी आणि अनुज बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. लोढा पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात उतरवून मॅजिक इन्क्युबेशन सेंटरच्या सहकार्याने कौशल्याधारित उद्योग सुरू करून आयडीया ते इन्कम टॅक्स धारकहा प्रवास साध्य करावा. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना उद्योगामध्ये रूपांतरित करून त्या माध्यमातून स्वतःचे उत्पन्न वाढविणे व रोजगार निर्मिती करणे एवढ्यावरच न थांबता. त्यांनी आपले उत्पन्न वाढवून आयकरधारक होण्याची संधी या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. आई-वडिलांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युवक-युवतींनी नवकल्पना मांडून यशस्वी उद्योजक व व्यवसायिक बनावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास उपस्थित उमेदवारांशी संवाद साधून, आयटीआयमध्ये कोणते अभ्यासक्रम अपेक्षित आहेत याबाबत त्यांनी प्रत्यक्ष विचारणा केली. यावेळी उमेदवारांनी सुचविलेल्या ड्रोन ऑपरेटर, सोलार टेक्नीशियन, इलेक्ट्रिक व्हेइकल टेक्नीशियन, ब्युटी थेरपिस्ट आदी अभ्यासक्रम दि. 08 ऑक्टोबर, 2025 पर्यंत हमखास रोजगार देणारे प्रशिक्षण म्हणून सुरू करण्याचे निर्देश व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागास त्यांनी यावेळी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्ह्यातील युवकांना मॅजिक सेंटरच्या माध्यमातून आपला स्वत:चा स्टार्टअप सुरु करण्याची संधी निर्माण झाली आहे. अशी संधी  देणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. या मॅजिक सेंटरमुळे भविष्यात खुप चांगले परिणाम आपणांस पाहण्यास मिळणार आहे. उद्योग उभारण्यासाठी लागणारे डिझाईन आणि भांडवल यासाठीचे मार्गदर्शन व मदन या सेंटरद्वारे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नवसंकल्पनाधारकांनी मॅजिक इन्क्युबेशन सेंटरमध्ये आपली नोंदणी करून, यशस्वी उद्योजक बनावे. तसेच ग्रामीण भागातील नवसंकल्पनाधारक युवक-युवतींसाठी तालुकास्तरावर मॅजिकप्रमाणे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास विभागाचे कौशल्य विकास अधिकारी भुजंग रिठे, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, अमोल बोरकर, प्रदीप डोळे, दिपक पालवे, अमर तुपे तसेच मॅजिकचे अधिकारी राघवेंद्र कुलकर्णी, शशीकांत तिवारी, प्रिती कामठे, कृष्णा टेकाळे, आयेशा मन्सुरी, मिरा चितांमणी, गौरव पटेल यांनी सहकार्य घेतले.

यावेळी कार्यक्रमास येथील जिल्ह्यातील उद्योजक,  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पूरग्रस्त पिठोरी सिरसगावाची केली पाहणी



      जालना, दि.26 (जिमाका) : जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील शेतपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी (दि.25) रोजी अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगावात अतिवृष्टी झाल्याने सर्व गाव पुराचे पाणी खाली आले होते, या गावाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधुन त्यांनी या आसमानी संकटात मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याचे आहे. तसेच प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन बाधीत नागरिकांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी शेतकऱ्यांनी मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करावा अशी मागणी करत आपल्या समस्या श्री. आठवले यांच्यासमोर मांडल्या असता, त्यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी  केंद्र  सरकारद्वारे राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचे आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसिलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह पिठोरी सिरसगावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.


Thursday, 25 September 2025

सुधारीत दौरा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौरा

 


  जालना दि.24 (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे जालना जिल्‌ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे शुक्रवार  दि. 26  सप्टेंबर 2025 दुपारी 1.55 वाजता हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आगमन. दुपारी 2.00 वाजता इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनास मुख्य अतिथी म्हणुन उपस्थिती. दुपारी 3.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथील जागेवर झालेल्या अतिक्रमण विषया संदर्भात बैठक दुपारी 3.30  वाजता शॉर्ट टर्म कोर्सबाबत जालना जि.व्य.शि.प्र. विभागाची बैठक.सायंकाळी 4.30 वाजता पुरग्रस्त शेतकऱ्यांची भेट. स्थळ – मु. पो. शेलगाव, ता. बदनापूर, जि. जालना सायंकाळी 5.00 वाजता मु. पो. शेलगाव, ता. बदनापुर जि. जालना येथून छत्रपतीसंभाजीनगरकडे प्रयाण.

-*-*-*-*-*-

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौरा

 


जालना,दि.25(जिमाका):   उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे  शुक्रवार दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौऱ्यावर येत असुन त्यांचा जालना दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे सकाळी  11.00 वाजता जालना शहर व ग्रामीण अतिवृष्टीमुळे बाधीत भागाची व औद्योगिक क्षेत्राची पाहणी. दुपारी 4.00 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण.

-*-*-*-*-*-*-

जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसिध्दी जिल्हा स्तर समितीमध्ये जिल्हा समन्वय नेमण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


जालना,दि.25 (जिमाका) :  जादुटोणा  या क्षेत्रात कार्य करणाऱ्या  नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय  कार्य करणारे समाजसेवक महिला, पुरुष यांनी भारतीय समाजात  रुजलेल्या काही अनिष्ट, अघोरी, अमानुष  आणि संस्कारातुन रुजलेल्या अनेक प्रकारच्या गैरसमजुतीमुळे समाजाचे  अतोनात  नुकसान होतांना दिसून येत आहे. लाखो माणसांचे  जीव वाचविण्यासाठी त्यांचे होणारे शोषण व छळ थांबविण्यासाठी व समाजाचे मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी समाज प्रबोधनासोबतच अघोरी, अमानुष, प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसिध्दीचे कार्य करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती गठीत केली असून त्यामध्ये जिल्हा समन्वयक (विना मोबदला) नेमण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

महिला, पुरुष व्यक्ती यांनी जिल्हा स्तरावर जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसिध्दीचे कार्य करण्यासाठी प्रस्ताव सादर करावयाचे आहेत त्यांनी हे प्रस्ताव दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजीपर्यंत आवश्क कागदपत्र तसेच व पोलिस विभागाचे चारीत्र्य  प्रमाणपत्रासह  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,   डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,  यांनी कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत प्रस्ताव दाखल करावेत. असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण,राजु एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम, 2021 च्या अंमलबजावणीसाठी दिनांक 30 जून, 2026 पर्यंत मुदतवाढ बाबत

 


जालना,दि.25 (जिमाका) : महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे श्रेणीवाद व नियंत्रण) अधिनियम, 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पुर्वीचे अनधिकृत भुखंड अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधीन करण्यास मान्यता दिलेली आहे. जालना जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील दि. 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमान्वित करण्यासाठी सहायक संचालक, नगर रचना जालना यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट इंजिनियर यांचेमार्फत प्रस्ताव दाखल करणेसाठी दिनांक 30 जून, 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तरी जालना जिल्हयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, जालना जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्र वगळून उर्वरित ग्रामीण भागातील दिनांक 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमान्वित करण्यासाठी दिनांक 30 जुन, 2026 पुर्वी विहीत कागदपत्रासह प्रस्ताव गुंठेवारी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करावे. तसेच उपरोक्त प्रमाणे मुदतीत प्रस्ताव दाखल केले नसल्यास अशी अनधिकृत विनापरवाना बांधकामे पाडणेची कार्यवाही करण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष), तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज लाभार्थ्यांना व्याज रकमेत 50 टक्के सवलत

 


जालना,दि.25 (जिमाका) : "महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपुर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्यात बाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना दि.31 मार्च  2026 पर्यंत  राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी सदर योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे.अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाशी (दुरध्वनी क्रमांक 02482 -223420) संबंधितांनी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एम. राठोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

डाक विभागात तात्पुरत्या आणि कमिशन तत्वावर ग्रामीण डाक जीवन विमा एजंटसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


जालना,दि.25(जिमाका) : छत्रपती संभाजीनगर डाक विभागातील कन्नड, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफ्राबाद आणि सोयगाव या तालुक्यांमध्ये एकुण 50 जागांसाठी ग्रामीण डाक जीवन विमा एजंट नेमणे आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे. याकरीता वयोमर्यादा 18 ते 60 वर्ष, शैक्षणिक पात्रता 5 हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातील रहिवासी असल्यास किमान 10 वी पास, 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावातील रहिवासी असल्यास किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेद्वारांनी प्रवर अधीक्षक, डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, जुना बाजार, छत्रपती संभाजीनगर-431 001 यांच्या कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारे मुळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकीत प्रत व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह दि. 30 सप्टेंबर, 2025 पर्यंत प्रवर अधीक्षक, डाकघर, छत्रपती संभाजीनगर विभाग, छत्रपती संभाजीनगर 431 001 यांच्याकडे सादर करावेत.

-*-*-*-*-*-*-

लोकशाही दिनाचे दि. 6 ऑक्टोबर रोजी आयोजन

 


जालना, दि. 25 (जिमाका):- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे पहिल्या सोमवारी करण्याबाबत निर्देश आहेत. जिल्ह्यात दि. 6 ऑक्टोबर 2025 सोमवार रोजी सकाळी ठिक 10.00 ते 12.00 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व या तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा तसेच ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही अशा अर्जदाराचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे कार्यालयाकडुन सुचीत करण्यात येत आहे. कोणत्याही स्तरावर लोकशाही दिनात खालील बाबींशी संबंधित अर्ज स्वीकारले जाणर नाहीत. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व,अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाशी तसलिदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदती व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज  http:jalna.mic.in  या संकेस्थळावर उपलब्ध आहे.

-*-*-*-*-*-*-

 

3571

 

 

Wednesday, 24 September 2025

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा 26 सप्टेंबर 2025 रोजी जालना जिल्हा दौरा

 


 

  जालना दि.24 (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे जालना जिल्‌ह्याच्या दौऱ्यावर येत असुन त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीप्रमाणे दुपारी 1.55 वाजता हुतात्मा जनार्धन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आगमन. दुपारी 2.00 वाजता इन्क्युबेशन सेंटरच्या उद्घाटनास मुख्य अतिथी म्हणुन उपस्थिती. दुपारी 3.00 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथील जागेवर झालेल्या अतिक्रमण विषया संदर्भात बैठक दुपारी 3.30  वाजता शॉर्ट टर्म कोर्सबाबत जालना जि.व्य.शि.प्र. विभागाची बैठक.सायंकाळी 4.00 वाजता जालना येथून छत्रपतीसंभाजीनगरकडे प्रयाण.

-*-*-*-*-*-  

महाराष्ट्र राजपत्रित नागरी संयुक्त पुर्व परीक्षा 2025 साठी परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 


        जालना दि.24 (जिमाका) : महाराष्ट्र राजपत्रित नागर संयुक्त पुर्व परीक्षा 2025 ही दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी  सकाळी 10.00 ते 12.00 व दुपारी 3.00 ते 6.00 या वेळेत जालना जिल्ह्याच्या बद्रीनारायण बारवाले कॉलेज एमआयडीसीजवळ औरंगाबाद रोड, जालना. मत्सोदरी शिक्षण संस्था अंकुशराव टोपे कॉलेज, मोतीबाग ओव्हरब्रीज जवळ जालना. राष्ट्रीय हिंदी विद्यालय, देऊळगावराजा रोड, जालना. श्री. एम.एस. जैन विद्यालय (मराठी मिडियम), गणेश नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, जालना या 4 केंद्रावर घेण्यात येणार असुन अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सर्व सार्वजनिक टेलिफोन/ एसटीडी बुथ/फॅक्स/झेरॉक्स व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे.  हा आदेश दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत लागु राहतील असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहेत.

-*-*-*-*-*-

3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2025 अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणुन साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 


 

जालना दि.24 (जिमाका) : दि. 3 ऑक्टोबर  हा दिवस अभिजात  मराठी भाषा दिवस व दि. 3 ऑक्टोबर  ते 9 ऑक्टोबर 2025 हा कालावधी अभिजात मराठी भाषा  सप्ताह साजरा करण्याचे  प्रशासनाने निर्देश दिले आहे.

सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाव्या अखत्यारीतील राज्यातील सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी उद्योग, आस्थापना  व व्यापारी बँक, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/ महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थामध्युन  अभिजात मराठी भाषे संदर्भात  जास्तीत जास्त संशोधन,संवर्धन व जनजागृती व्हावी या हेतूने  प्रतिवर्षी दि . 3 ऑक्टोबर  हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दि. 3 ऑक्टोबर  ते 9 ऑक्टोबर 2025  या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीमार्फत 2 ऑक्टोबर पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम

 


जालना दि.24 (जिमाका) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कालावधीनिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांकरीता  जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी  विशेष मोहीमेचे आयोजन उपायुक्त जिल्हा जाती प्रमाणपत्र पडतळणी समिती यांनी केले आहे.

जिल्ह्यात सेवा पंधरवाड्यात 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व प्रवेशित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशीत त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबीत विद्यार्थ्यांना जात वैधताप्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविली जाणार आहे. जी त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित प्रकरणे आहेत अशा अर्जदारांना ई-मेलद्वारे कळविले आहे. परंतु ज्यांची त्रुटीची पुर्तता केलेली नाही अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास कागदपत्रे त्रुटी पुर्ततेसाठी कॅम्प राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे निकाली काढण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभुमीवर  विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना तो व्यवस्थित भरला जाईल त्यामधील सर्व माहिती स्व:त खात्री करुन भरता यावी  तसेच योग्य परिपुर्ण कागदपत्रे अपलोड करावीत यासाठी सदर अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी तो व्यवस्थित भरला आहे याची खात्री करण्याचे आवाहन उपायुक्त जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


जालना दि.24 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 24 सप्टेंबर व 26 सप्टेंबर 2025 ते  दि. 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 25  सप्टेंबर 2025 रोजी हलका ते मध्यम व दि.28 सप्टेंबर 2025 रोजी  तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

“मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” चे 26 सप्टेंबर रोजी उद्घाटन

 


जालना, दि.24 (जिमाका): जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थी तसेच नवउद्योजकांमध्ये नाविन्य व उद्योजकता वृद्धीसाठी, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे MAGIC (Marathwada Accelerator for Growth and Incubation Council), छत्रपती संभाजीनगर यांच्याव्दारे इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने, सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील को-वर्किंग व कार्यालयीन जागेचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याच्या मार्गावर आहे.या अनुषंगाने, गुरुवार, दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्री,  मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर या केंद्राचा उद्घाटन समारंभ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे.मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर च्या स्थापनेमुळे नवीन उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन,प्रशिक्षण व सुविधा मिळणार असून, नवउद्योजकांना स्टार्टअप कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत होणार आहे.त्याचप्रमाणे बँक व शासकीय योजनांशी जोडणी करून आर्थिक साहाय्य मिळविण्याची संधी, कौशल्य, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा थेट अनुभव व नेटवर्किंग होणार, जिल्ह्यातील नव्या उद्योग जगतात  सक्रिय सहभाग व संधी उपलब्ध होणार आहे. सदर उद्घाटन समारंभास आपण उपस्थित राहून आपल्या प्रगतीसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक,आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे

-*-*-*-*-*-  

 

जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी

 


 





जालना,दि.24(जिमाका): जालना जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे त्यामुळे नदीच्या काठावरील अनेक गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.  जिल्ह्यातील काही गावात देखील नदीचे पाणी घुसून नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. काहींच्या घरात पाणी आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आज जालना जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांचा दौरा केला. यावेळी श्रीमती मुंडे यांनी परतूर तालूक्यातील गोळेगाव, घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा, कुंभार पिंपळगाव, मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि अंबड तालुक्यातील सुखापूरी, शहापूर या गावांना भेट देऊन येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

            यावेळी श्रीमती मुंढे यांनी नागरिकांशी संवाद साधुन, त्यांना तात्काळ मदत करणार असल्याचे आश्वासित केले. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, परंतू शासनामार्फत पुरग्रस्त भागातील बाधीत नागरिक आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासन नागरिकाच्या पाठीशी असून, कोणीही काळजी करू नये. बाधित नागरिकांना शासन शक्य ती मदत करणार आहे. परतूर तालुक्यातील गोळेगावचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मी पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच या पुरामुळे अनेक नागरिक बेघर झाले असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यात येणार आहे. ज्या भागात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्या भागात अतिवृष्टी घोषित करण्याचा नियम आहे. परंतु जिल्ह्यात ज्याठिकाणी 65 मिमी पेक्षा देखील कमी पाऊस झाला असेल पण त्या ठिकाणी जास्त नुकसान झाले असल्यास त्याचेही पंचनामे करण्याच्या तसेच जिल्ह्यातील पर्जन्यमापकाची तपासणी करण्याच्या सूचना श्रीमती पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या.

यावेळी परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिनु, परतूरचे उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसिलदार प्रतिभा गोरे, घनसावंगीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार पूजा वंजारी, तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह नांदूर हवेली येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे "काळजी करू नका, शासन आपल्या सोबत...

 










 

जालना,दि.24(जिमाका): जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. सोमठाणा, ता.बदनापूर, ढाकलगाव, ता. अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन "काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे" असा धीर दिला. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जालना जिल्ह्यातील सोमठाणा, ता.बदनापूर व ढाकलगाव, ता. अंबड शिवारात आज सकाळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह महसूल, कृषि, पशुसंवर्धन, कृषि विद्यापीठ यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री.भरणे संवाद साधताना म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाने कष्टाने पिकविलेल्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात नुकसानीचे क्षेत्र अधिक आहे. कपाशी, सोयाबीन यासह इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पशुधन तसेच घराची पडझड झाली आहे.  जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांसह तातडीने पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे, असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

जालना जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आहे. गेल्या आठ-दहा दिवसात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शेतीशिवारात पिके पाण्याखाली आहेत, तर कुठे पीक वाहून गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने मदत पोहचलीच पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने तत्परतेने पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

राज्याच्या कृषिमंत्री म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तसेच शासनाची भूमिका शेतकऱ्याला आधार देण्याचीच असून नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव सादर होताच मदत तत्परतेने मदत मिळेल, संकटाच्या काळात आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहूयात असेही ते म्हणाले. यावेळी शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-