Wednesday, 27 May 2020

जिल्ह्यात नऊ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह चार व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह चौघांनाही जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना दि. 26 (जिमाका) –  जालना जिल्ह्यात दि. 27 मे रोजी 08 तर दि. 26 मे रोजी रात्री उशिरा एक अशा एकुण 9 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन राज्य राखीव दलाच्या तीन जवानांच्या स्वॅबचा अहवाल  तसेच कानडगाव ता. अंबड येथील 58 वर्षीय व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्याने या चौघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
मुंबई येथुन परतलेले व मुळचे नुतनवाडी ता. जालना येथील रहिवाशी असलेला 11 वर्षीय मुलगा, 16 वर्षीय बहिण यांच्या स्वॅबचा अहवाल दि. 18 मे रोजी पॉझिटीव्ह आला होता.  त्यांच्याच निकट सहवाशितामध्ये आलेल्या नुतनवाडी येथील एका 55 वर्षीय महिलेचा तसेच चांदई एक्को येथील 36 वर्षीय पुरुष व त्यांची १२ वर्षीय मुलगी, जुना जालनापरिसरातील एका खासगी रुग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांचा, छत्तीसगड येथुन आलेला व मुळचा खापरदेव हिवरा ता. जालना येथील रहिवाशी असलेल्या २४ वर्षीय तरुणाचा, पिरगैबवाडी ता. अंबड येथील ४२ वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल दि. 27 मे, 2020 रोजी तर दि. 26 मे, 2020 रोजी रात्री उशिरा हिवरा काबली येथील 27 वर्षीय महिलेच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकुण 2221 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 59 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 1007 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 101 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2390 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -09 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 85 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2183, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 345, एकुण प्रलंबित नमुने -118 तर एकुण 948 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-08, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 838 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या- 114, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -399, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-08, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -59, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -68, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-2568 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 399 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-07, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-28,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -42, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-16, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -126 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-14, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-02 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -23, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-24, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –37, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-07, मॉडेल स्कुल मंठा-38 शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर - 2, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी-15 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 666 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 119 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 618 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 94 हजार 930 असा एकुण  3 लाख 21  हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  
*******

पीककर्जासाठी शेतकऱ्यांना बँकाकडून संदेश प्राप्त होताच आवश्यक त्या कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी बँक शाखेत उपस्थित राहण्याचे आवाहन


जालना दि. 27 (जिमाका) –  खरीप हंगाम 2020-21 करीता जिल्ह्यामध्ये बँकातर्फे पिककर्ज वाटप सुरु आहे. जागतिक महामारी कोवीड – 19  विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाकडुन देशपातळीवर संचारबंदी घोषीत करण्यात आलेली  आहे. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या  अनुषंगाने कोविड  -19 या आजाराचा प्रसार होऊ नये. यासाठी होणा-या गर्दीचे नियमन करण्यासाठी जालना जिल्ह्यातील पिक कर्जासाठी इच्छुक शेतक-यांनी  https://forms.gle/2T19Tth3uQFe5CgS9   या संकेतस्थळावरील, गुगल लिंकवरील ऑनलाईन अर्ज भरुन पीक कर्ज मागणी नोंदणी दि. 31 मे अखेरपर्यंत करण्यात येत आहे. सदरची लिंक jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असुन या लिंकद्वारे  नोंदणी केलेल्या शेतक-यांच्या याद्या जिल्हा अग्रणी बँक, जालना यांचे मार्फत संबंधीत बँकेकडे पाठविण्यात येत आहे. यादी प्राप्त झाल्यानंतर संबंधित बँक शाखेकडुन पीक कर्ज घेण्यास पात्र असणा-या शेतक-यांना दुरध्वनी, लघुसंदेश (SMS) पाठविण्यात येत आहे. बँकमार्फत दुरध्वनी, लघुसंदेश (SMS) प्राप्त झालेल्या शेतक-यांनी बँकेने दिलेल्या तारखेस खालील कागदपत्रासह शाखेत जावे.
 राष्ट्रीयकृत, व्यापरी, ग्रामीण बँकेसाठी आवश्यक कागदपत्रे 7/12 सर्वांसाठी आवश्यक, 8 अ सर्वांसाठी आवश्यक, फेरफार नवीन कर्जदारांसाठी आवश्यक तसेच मागील 5 वर्षांमध्ये मालकी हक्कात बदल (वारस किंवा खरेदी विक्रीद्वारे )असल्यास जुन्या कर्जदारांसाठीही आवश्यक आहे, आधर कार्ड सर्वांसाठी आवश्यक, फोटो 2 सर्वांसाठी आवश्यक, लीगल सर्च रिपोर्ट  (कायदेशीर शोध अहवाल)   1 लाख रुपयापर्यंतचे कर्जासाठी आवश्यक नाही, 1 लाखाच्यावरील कर्जासाठी आवश्यक, ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate) इतर बॅकांचे No Dues Certificate आवश्यक नाही. त्याऐवजी स्टॅम्प पेपवरील स्वयं घोषणापत्र  आवश्यक राहील. बॅकानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दि. 28 जानेवारी 2015 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी, गहाणखताचे घोषणापत्र (Declaration Mortgage) बँकेच्या नियमानुसार आवश्यक राहील,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकरीता आवश्यक कागदपत्रे  7/12 सर्वांसाठी आवश्यक, 8 अ सर्वांसाठी आवश्यक, फेरफार नवीन कर्जदारांसाठी आवश्यक तसेच मागील 5 वर्षांमध्ये मालकी हक्कात बदल (वारस किंवा खरेदी विक्रीद्वारे )असल्यास जुन्या कर्जदारांसाठीही आवश्यक आहे, आधर कार्ड सर्वांसाठी आवश्यक, फोटो 2 सर्वांसाठी आवश्यक, लीगल सर्च रिपोर्ट  (कायदेशीर शोध अहवाल)   1 लाख रुपयापर्यंतचे कर्जासाठी आवश्यक नाही, 1 लाखाचेवरील कर्जासाठी आवश्यक, ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate) इतर बॅकांचे No Dues Certificate आवश्यक नाही. त्याऐवजी स्टॅम्प पेपवरील स्वयं घोषणापत्र  आवश्यक राहील. बॅकानी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दि. 28 जानेवारी 2015 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी, संबंधित वि.का.स. संस्थेच्या ठराव आणि कमाल मर्यादा पत्रकात नावाचा समावेश असावा, स्टॅम्प पेपर बँकेच्या नियमानुसार आवश्यक राहतील.
याद्वारे कळविण्यात येते की, सर्व बँकांनी केवळ वरील प्रमाणे नमुद कागदपत्रे पीक कर्ज मंजुर करतेवेळी शेतक-यांकडुन घेण्यात यावीत. इतर अनावश्यक कागदपत्रांची मागणी बॅंकांनी करु नये. बँकेने अनावश्यक कागदपत्रांची मागणी केल्यास तसेच पीक कर्ज मंजुर करण्यास टाळाटाळ केल्यास शेतक-यांनी संबंधीत तालुक्यातील तहसिलदार, सहायक निबंधक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, द्वारा मुख्य शाखा बँक ऑफ महाराष्ट्र जालना व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना येथे संपर्क साधावा, असे आदेश जिल्हाधिकारी जालना  रवींद्र बिनवडे  यांनी दिले आहेत.
-*-*-*-*-*-

     


खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि-बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या पीककर्जाचे उद्दिष्ट पुर्ण न करणाऱ्या तसेच कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करा -कृषिमंत्री दादाजी भुसे


जालना दि. 27 (जिमाका):- शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेऊन उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करावेत.  तसेच पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये असमर्थ ठरणाऱ्या, पीककर्ज वाटपामध्ये टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश कृषि व माजी सैनिककल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये विभागीय खरीप हंगाम 2020 आढावा बैठकीचे सामाजिक अंतराचे पालन करत आयोजन करण्यात आले होते. 
            यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, औरंगाबादचे विभागीय कृषि सहसंचालक डी.एल. जाधव, लातुर विभागाचे डी.एन जगताप, जालन्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            कृषिमंत्री श्री भुसे म्हणाले,  शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी पीककर्जाची निकड असते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करुन द्यावे. शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे. शेतकऱ्यांनी पीककर्जाची मागणी करुनही त्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अथवा पीककर्जाचे प्राप्त उद्दिष्ट पुर्ण न करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देत पीक कर्ज वितरणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन पीककर्जापासुन शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
            पीकउत्पादन वाढून शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर शासन भर देत असल्याचे सांगत खरीप हंगामामध्ये बि-बियाणे, रासायनिक खते यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा करण्यात आला आहे.  बि-बियाणे तसेच रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही, याबाबतचे कृषि विभागामार्फत सुक्ष्म असे नियोजन करण्यात आले असुन खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत जालना जिल्हा उत्पादकतेमध्ये अग्रेसर असल्याबद्दल जिल्ह्याचे अभिनंदन करुन मराठवाड्यातील इतर जिल्ह्यानीही जालना जिल्ह्याच्या धर्तीवर उपक्रम राबवुन उत्पादकता कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.
            युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना युरीया कमी पडणार नाही मात्र जमिनीचा पोत चांगला रहावा, यासाठी शेतकऱ्यांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तथापि,याबाबत सुक्ष्म नियोजन करुन शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही कृषि मंत्री श्री भुसे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचे सांगत विदर्भ, मराठवाड्यातील संत्री संपुर्ण महाराष्ट्रभर पोहोचविण्यात आली.कोकणातला आंबा, नाशिक व इतर ठिकाणाहुन पीकविण्यात येणारे द्राक्षे पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी पोहोचवुन अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले असुन या कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामध्ये कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबरच आपल्या कुटूंबाचीही काळजी घेण्याचे आवाहन कृषिमंत्र्यांनी यावेळी केले.
            राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. मराठवाड्यात पीककर्ज वाटपामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांचे काम समाधानकारक नसल्याची खंत व्यक्त करत राष्ट्रीयकृत बँकांसुद्धा पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण करत नसल्याचे सांगुन मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालावे. पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पुर्ण न करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच पीककर्ज वाटप हे जुनअखेरपर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना देत जालना जिल्ह्यामध्ये कृषि विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.  ही पदे तातडीने भरण्याची मागणीही कृषिमंत्र्यांकडे यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी केली.
जालना जिल्हा उत्पादकतेमध्ये अग्रेसर
कृषिमंत्र्यांनी केले जालना जिल्ह्याचे कौतुक
       मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्हा उत्पादकतेमध्ये अग्रेसर असल्याने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक करत कृषिमंत्री श्री भुसे यांनी अभिनंदन केले व इतर जिल्ह्यांनीही जालना जिल्ह्याच्या धर्तीवर उपक्रम राबवुन उत्पादकता कशी वाढेल याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले.   सन 2018 मध्ये कापुस पीकाची उत्पादकता ही 217 किलोप्रतिहेक्टर होती ती सन 2019 मध्ये 480.65 किलोप्रतिहेक्टर झाली आहे.  सोयाबीन895 किलोप्रतिहेक्टर होती सन 2019 मध्ये 1726.61, मका-1923 सन 2019 मध्ये 2578.06, तुर-472 सन 2019 मध्ये 1477.91, मुग-255 सन 2019मध्ये 629.63 तर उडिदाची सन 2018 मध्ये 323 किलोप्रतिहेक्टर एवढी उत्पादकता होती आणि सन 2019 मध्ये ती वाढुन 829.97 किलो प्रतिहेक्टर एवढी झाली आहे.

            यावेळी महाराष्ट्र फटीलायजर डिलर्स असोशिएशन, पुणे यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लक्ष रुपयांचा धनादेश कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सुपूर्द केला.  यावेळी असोशिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ करळे, सचिव प्रकाश मुथा, अतुल लड्डा आदींची उपस्थिती होती.
            बैठकीस मराठवाड्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सर्व जिल्हा उपनिबंधक, सर्व लिडबँकांच्या व्यवस्थापकांची उपस्थिती होती.
*******    



Tuesday, 26 May 2020

जालना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील गाळ लाभाधारक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने काढून घ्यावा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे आवाहन


जालना दि. 26 (जिमाका) –  सध्या उन्हाळयाच्या कालावधीत शेतीमधील मशागतीचे कामे सुरु आहेत.  त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील बरेचशे प्रकल्प, सिंचन तलाव, साठवण तलावातील पाणीसाठी कमी झालेला आहे.  त्यामुळे बऱ्याचशा तलावात मोठ्या प्रमाणात गाळ मिळु शकतो.  या गाळाचा वापर शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी केल्यास शेत जमिनीची प्रत सुधारुन शेतजमिनीची सुपिकता वाढुन शेती उत्पन्नात वाढ होणार आहे.  त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांनी तलावात उपलब्ध असलेला गाळ शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वखर्चाने काढणार असतील तर त्यासाठी तातडीने नियोजन करावे.  तसेच शेतकरी स्वखर्चाने गाळ घेऊन जाण्यास तयार असतील त्यांनी संबंधित तहसिलदार, सिंचन विभागाच्या कार्यालयाकडे संपर्क करुन रितसर परवानगी घेऊन गाळ काढुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
सध्या जालना जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे एकुण 47, प्रकल्प व जलसंधारण विभागाचा एक लघुपाटबंधारे तलाव व 13 साठवण तलाव, जिल्हा परिषद विभागाकडील 14 सिंचन तलावापैकी ज्या तलावात अत्यल्प पाणीसाठी आहे किंवा जे प्रकल्प कोरडे आहेत त्यामधील गाळ काढण्याचे काम त्वरित संबंधित तलावाचे शाखाधिकारी व उप विभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात यावे.  त्यानंतर ज्या प्रमाणात गाळ काढण्यासाठी बुडीतक्षेत्र उपलब्ध हेाईल्, त्याप्रमाणे सर्व कामे सुरु होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तलावातील गाळ काढल्यामुळे तलावाणी पाणी साठवण क्षममेमध्ये वाढ होऊन सिंचनक्षमता वाढीस मदत होणार असल्याचेही नमूद केले आहे.
कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता गाळ काढण्यासाठी सामाजिक अंतर ठेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. पावसाळा कालावधी लवकरच असल्याने उर्वरित कालावधीचा विचार करता विविध ठिकाणी एकाच वेळी कामे सुरु होतील, याची दक्षता घेण्चाचे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
*******

नागरिकांनी सामाजिक अंतराचे पालन करण्याबाबत जनमानसामध्ये जनजागृती करा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे


जालना, दि. 26 -  जालना जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत नागरिकांचे जनजीवन सुरळीत सुरु झाले असुन प्रत्येक नागरिकाने सामाजिक अंतराचे पालन करावे यासाठी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी श्री बिनवडे बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, संपर्क अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सहवासितांची माहिती तातडीने घ्यावी.  तसेच हायरिस्क सहवासितांना कोव्हीडकेअर सेंटरमध्ये दाखल करावे.  एखाद्या ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास उप विभागीय अधिकारी यांनी तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावा.  तसेच प्रतिबंधित क्षेत्रातुन अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही फिरणार नाही. त्याचबरोबरच एखाद्या रुग्णालयात संशयीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास ते रुग्णालय बंद न करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
*******

जिल्ह्यात पाच व्यक्तींच्या स्वॅबचे अहवाल पॉझिटीव्ह जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती


जालना दि. 26 (जिमाका) –  मुंबई येथुन परतेले व मुळचे मठ पिंपळगाव ता. अंबड येथील रहिवाशी असलेला 11 वर्षीय मुलगी व 10 वर्षीय मुलगा या दोघांच्या स्वॅबचा, मुंबई येथुन परतलेले व मुळचे वखारी वडगाव ता. जालना येथील रहिवाशी असलेल्या 25 वर्षीय व 28 वर्षीय अशा दोन महिलांच्या स्वॅबचा तसेच हिवरा काबली ता. जाफ्राबाद येथील 7 वर्षीय मुलाच्या अशा एकुण पाच जणांच्या स्वॅबचा अहवाल दि. 26 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.       
जिल्ह्यात एकुण 2098 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 64 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 999 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 175 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2290 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -05 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 76 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2023, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 336, एकुण प्रलंबित नमुने -187 तर एकुण 935 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-12, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 830 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या- 59, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -351, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-13, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -64, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -55, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-2427 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
            कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 351 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-00, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-27,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -42, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -24 मॉडेल स्कुल, अंबारोड, परतुर-03, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-14, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-44 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -23, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-13, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –52, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-04, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-00,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल क्र.2 भोकरदन-00, मॉडेल स्कुल मंठा-36 शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर - 2, सेठ ई.बी.के. विद्यालय टेंभुर्णी-15 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 661 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 118 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 617 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 94 हजार 930 असा एकुण  3 लाख 21  हजार 738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  
*******


Monday, 25 May 2020

सुरज ॲग्रोटेक प्रा.लि. अंबड या कापुस खरेदी केंद्रावर ग्रेडर म्हणून कृषि पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या


ग्रेडर म्हणून कृषि पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या
        जालना, दि. 25 – मे. सुरज ॲग्रोटेक प्रा.लि. अंबड या कापुस खरेदी केंद्रावर महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ म. मुंबई यांच्यामार्फत होणाऱ्या कापुस खरेदीसाठी ग्रेडर म्हणून सुनिल गोधने, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मंठा व विजय वाघमारे, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, परतुर यांची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये नियुक्ती केली आहे.  नियुक्त कर्मचाऱ्यांनी विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ, विभागीय कार्यालय, औरंगाबाद यांच्या नियंत्रणात व सुचनेनुसार ग्रेडींगचे कामकाज दि. 26 मे, 2020 पासुन सुरु करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे.
*******