Thursday, 23 April 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विशेष संवाद व कृती कार्यक्रम संपन्न

 


 

जालना, दि. 23 (जिमाका) :-  महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत जालना लघुपाटबंधारे व जालना पाटबंधारे विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा-2026’ निमित्त बुधवार दि.22  एप्रिल रोजी कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे विशेष संवाद व कृती कार्यक्रम संपन्न झाला.

 राहुल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे समन्वयक डॉ. एस. डी. सोमवंशी, अजिंक्य शिनगारे आणि मुख्य वक्ते म्हणून डॉ. अश्विनी बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता अ. प. शिनगारे, एस. एम. शेळके, सहाय्यक कार्यकारी अभियंता जी. पी. पवार आणि उपविभागीय अभियंता व्ही. डी. ढाकने, डी. ए. शास्त्री, के. डी. मोहिते यांसह जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रामुख्याने पाणी वापराचे सुयोग्य नियोजन आणि शाश्वत जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली. कृषी क्षेत्रात पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती (ठिबक व तुषार सिंचन) आणि पीकनिहाय पाणी नियोजनाचे महत्त्व तज्ज्ञांनी पटवून दिले. जलस्रोतांच्या संवर्धनामुळे उत्पादनात वाढ आणि पाण्याची बचत कशी साध्य करता येते, यावर मार्गदर्शन करतानाच उपस्थित शेतकरी व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कृती आराखडा समजावून सांगण्यात आला. चला, जलसंपदा जपूया आणि शेती समृद्ध करूया हा संदेश देत जल आणि कृषी यांच्या समन्वयाद्वारे शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्याचा निर्धार या उपक्रमाद्वारे व्यक्त करण्यात आला.

-*-*-*-*-

वृत्त क्र. 190                                                                   दि.23 एप्रिल, 2026

 

आदिवासी विद्यार्थ्यांनी नामांकित इंग्रजी शाळेत

मोफत प्रवेशासाठी 25 मे पर्यंत अर्ज करावेत

 

जालना, दि. 23 (जिमाका) :-  अनुसूचित जमातीच्या  मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा संपूर्ण खर्च आदिवासी विकास विभाग उचलणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी दि. 25  मे 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

अर्जासोबत   अनुसूचित जमातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत.  सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला.  विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि दोन पासपोर्ट साईज फोटो.  जन्म तारखेचा पुरावा.  वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.  पालकांचे संमतीपत्रक. दारिद्र्यरेषेखालील असल्यास शिधापत्रिकेची प्रत व अनुक्रमांक आदि कागदपत्रे जोडावयाची आहेत.

या योजनेसाठीचे प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. इच्छुक पालकांनी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर' येथील शिक्षण विभागात संपर्क साधून आपले अर्ज दि. 25 मे पर्यंत सादर करावेत. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment