ज्ञानभारतम्’ मोहिमेचा शुभारंभ
जालना, दि. 13 (जिमाका) :- भारताचा समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी
केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने ‘ज्ञानभारतम्’
(Gyan Bharatam) ही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत जालना
जिल्ह्यातील मंदिरे, मठ, खाजगी ट्रस्ट आणि वैयक्तिक संग्राहकांकडे असलेल्या जुन्या
हस्तलिखितांचे सर्वेक्षण व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय कार्यात जिल्हावासियांनी
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये आणि खाजगी संग्राहकांच्या
सहकार्याने सुमारे एक कोटीपेक्षा अधिक हस्तलिखितांचा
संग्रह करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. हस्तलिखितांचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण,
संवर्धन आणि प्रसार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक
कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम जिल्ह्यात राबविली
जात आहे.
जालना जिल्ह्यात या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या
मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समिती
स्थापन करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी उपजिल्हाधिकारी
(सामान्य प्रशासन) यांची ‘जिल्हा नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली
आहे. हे सर्वेक्षण केवळ हस्तलिखितांच्या नोंदीसाठी आहे. मूळ हस्तलिखिते मालकाकडून काढून
घेतली जाणार नाहीत, तर त्यांचे केवळ शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण केले जाईल. या
मोहिमेसाठी खास ‘Gyan Bharatam’ नावाचे
मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. प्रशिक्षित सर्वेक्षकांमार्फत हस्तलिखितांची
पडताळणी व दस्तऐवजीकरण केले जाणार आहे.
ज्या संस्था किंवा व्यक्तींकडे प्राचीन किंवा जुनी हस्तलिखिते
उपलब्ध आहेत, त्यांनी या राष्ट्रीय कार्यात प्रशासनास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी
नागरिकांनी
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment