Tuesday, 19 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षकांची आयोगाकडून नियुक्ती

 









 

जालना,दि.19,(जिमाका): जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापूर(अ.जा.) व 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने  बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान तर दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने पाचही विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली  आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले मतमोजणी निरीक्षक दि. 21 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित विधानसभा मतदारसंघात दाखल होणार आहेत. भारत निवडणूक आयोगाच्यावतीने 99-परतूर विधानसभा मतदारसंघाकरीता श्री.नवीन (भा.प्र.से.), 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघाकरीता राजीव शुक्ला (एस.सी.एस.), 101-जालना विधानसभा मतदारसंघाकरीता भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 बॅचचे उत्तर प्रदेश कॅडरचे डॉ. वेद पती मिश्र (भा.प्र.से.), 102-बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाकरीता राजीव रंजन (एस.सी.एस.), 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघाकरीता श्रीमती रिचा (एस.सी.एस.) यांची नियुक्ती  करण्यात आली आहे.  

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. 99-परतूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबा-परतूर येथील पी.एम.श्री.जवाहर नवोदय विद्यालय, 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 101-जालना विधानसभा मतदारसंघाची जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 102-बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघाची बदनापूर येथील कृषि महाविद्यालयात आणि 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघाची भोकरदन  येथील नगर परिषद मंगल कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

Monday, 18 November 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदान केंद्रावरील निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

 

 

जालना,दि.18,(जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रावर जाणाऱ्या निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ (रॅन्डोमायझेशन) प्रक्रिया आज (दि. 18) रोजी भारत निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडण्यात आली. या प्रक्रियेनुसार, कोणत्या मतदान केंद्रावर कोणते पथक जाईल, हे मतदानाच्या एक दिवसापूर्वी म्हणजे 19 नोव्हेंबर, 2024 रोजी संबंधित पथकांना कळविण्यात येणार आहे.

यावेळी निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र आणि श्री. नवीन, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे आणि जिल्हा सूचना अधिकारी रविंद्र पडूळकर यांची उपस्थिती होती.

जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बुधवार, 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळत होणार आहे. यापूर्वी सरमिसळ प्रक्रियेने प्रत्येक मतदारसंघनिहाय मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले असून, मतदान पथकांना दोन प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. आज पार पडलेल्या तिसऱ्या सरमिसळ प्रक्रियेने कोणत्या मतदान पथकाला कोणते मतदान केंद्र मिळणार आहे, ते निश्चित झाले आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक यांच्या स्वाक्षरीने सदर माहिती सीलबंद लिफाफामध्ये टाकून प्रत्येक विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यानंतर  निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रत्येक पथकांना मिळालेल्या मतदान केंद्राबाबत माहिती देऊन मतदानाचे संपूर्ण साहित्य घेवून मतदान केंद्रावर रवाना करणार आहेत.

****


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याकरीता योग्य कार्यवाही करावी - जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 

 

जालना,दि.18,(जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या अनुषंगाने सर्व पूर्वतयारी झाली असून, मतदानपूर्व काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करुन उल्लंघन होणार नाही याकरीता सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करत कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.    

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानपूर्व 72 तासात करण्यात येणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था विषयक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र आणि श्री. नवीन, निवडणूक निरीक्षक (पोलीस) झेड ॲन विजया, निवडणूक निरीक्षक (खर्च) देव प्रकाश बमनावत, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजयकुमार बसंल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पांचाळ म्हणाले की, मतदानापूर्वीचे शेवटचे 72 तास आणि 48 तास या कालावधीत भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे कोटकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.  वेबकास्टींगद्वारे नियंत्रण ठेवावे, तसेच कुठेही अनियमितता होवू नये. स्थिर, फिरत्या पथकांची कार्यवाही सुरु  ठेवाव्यात. आचारसंहितेचे उल्लंघन होता कामा नये. मद्य विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच शेवटच्या कालावधीत प्रचारा दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी विशेष लक्ष देवून जबाबदारी पार पाडावी. कुठेही जाहिर प्रचार सुरू राहता कामा नये. भरारी पथकांनी चांगल्या प्रकारे सनियंत्रण करून अशा प्रचारावर बारीक लक्ष ठेवा. स्थिर पथकांनीही चांगल्या प्रकारे सतर्क राहून काम करावे करण्याच्या सूचना श्री. पांचाळ यांनी यावेळी दिल्या.

मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात उमेदवारांचे निवडणूक बूथ उभारण्यात येऊ नयेत. निवडणूक बूथ उभारण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, आवश्यकते नुसार शासकीय प्राधिकरणे तसेच स्थानिक प्राधिकरणे यांच्या परवानग्या घेणे आवश्यक राहिल. निवडणूक बूथ उभारल्यामुळे सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेचे अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. बूथ धार्मिक जागेमध्ये किंवा परिसरात उभारण्यात येऊ नये. निवडणूक बूथ शैक्षणिक संस्था किंवा रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात येऊ नये. अशा निवडणूक बूथवर पक्षाचा ध्वज आणि पक्षाचे चिन्ह लावता येणार नाही असेही श्री. पांचाळ यांनी यावेळी सांगितले.

निवडणूक बूथवर उपस्थित व्यक्तींकडून मतदानाकरिता येणाऱ्या मतदारांना कोणताही अडथळा किंवा प्रभाव होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रापासून 200 मिटर परिसरात कोणताही प्रचार करता येणार नाही. यावेळी पोलीस अधिक्षक अजयकुमार बसंल यांनी कायदा व सुव्यावस्था विषयक केलेल्या पूर्वतयारीचा अहवाल सादर केला.

 

****

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदान केंद्रावरील निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण · 1,755 मतदान केंद्रावर 7,917 अधिकारी यांची नियुक्ती

 




        जालना,दि.18,(जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रावर जाणाऱ्या निवडणूक पथकांची तिसरी सरमिसळ (रॅन्डोमायझेशन) प्रक्रिया आज (दि. 18) रोजी भारत निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडण्यात आली. या प्रक्रियेनुसार, कोणत्या मतदान केंद्रावर कोणते पथक जाईल, हे मतदानाच्या एक दिवसापूर्वी म्हणजे दि. 19 नोव्हेंबर, 2024 रोजी संबंधित पथकांना कळविण्यात येणार आहे.

       यावेळी निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र आणि श्री. नवीन, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे आणि जिल्हा सूचना अधिकारी रविंद्र पडूळकर यांची उपस्थिती होती.

      आज पार पडलेल्या सरमिसळ प्रक्रियेत जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील 1 हजार 755 मतदान केंद्रासाठी 1 हजार 954 टिम (राखीवसह), तर 7 हजार 816 अधिकारी-कर्मचारी यांची नेमणुक केली असुन, 101 सुक्ष्म निरीक्षक (राखीवसह) असे एकुण 7 हजार 917 (राखीवसह) अधिकारी-कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली.

      जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बुधवार, 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळत होणार आहे. यापूर्वी सरमिसळ प्रकियेने प्रत्येक मतदारसंघनिहाय मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले असून, मतदान पथकांना दोन प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. आज पार पडलेल्या तिसऱ्या सरमिसळ प्रक्रियेने कोणत्या मतदान पथकाला कोणते मतदान केंद्र मिळणार आहे, ते निश्चित झाले आहे. सामान्य निवडणूक निरीक्षक यांच्या स्वाक्षरीने सदर माहिती सीलबंद लिफाफामध्ये टाकून प्रत्येक विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यानंतर  निवडणूक निर्णय अधिकारी हे प्रत्येक पथकांना मिळालेल्या मतदान केंद्राबाबत माहिती देऊन मतदानाचे संपूर्ण साहित्य घेवून मतदान केंद्रावर रवाना करणार आहेत.

-*-*-*-*-*-*-

Wednesday, 13 November 2024

परतूर व घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंगरूमची निवडणूक निरीक्षक श्री. नवीन यांच्याकडून पाहणी

 










       जालना, दि.13 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक श्री. नवीन यांनी जिल्ह्यातील ९९-परतूर विधानसभा मतदारसंघ आणि १००-घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँगरूमला भेट देऊन पाहणी करत विविध सूचना केल्या.

         यावेळी अंबा-परतूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील स्ट्रॉंगरूम पाहणीच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी पद्माकर गायकवाड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

    निवडणूक निरीक्षक श्री.नवीन यांनी विधानसभा निवडणूकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राची व साहित्याची सिलिंग कर्मचारी करत असताना प्रत्यक्ष टेबलावर जाऊन कामाची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या.

         घनसावंगी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्ट्रॉंगरूम पाहणी करताना निवडणूक निरीक्षक श्री.नवीन यांच्यासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, प्रशिक्षणार्थी आयएएस श्री.अरुण, निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे यांच्यासह संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

          यावेळी मतदान यंत्रावर प्रत्यक्ष मतदान करून मतदान यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री काही कर्मचारी करत असताना निवडणूक निरीक्षक श्री.नवीन आणि जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी

प्रत्यक्ष टेबलवर जाऊन मॉकपोल करत व्हीव्हीपॅट मधील दिसणाऱ्या उमेदवारांच्या चिन्हांची पडताळणी केली. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दांडगे यांच्याकडून निवडणूक विषयक कामाचा आढावा घेतला.

-*-*-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूक निरीक्षक वेद पती मिश्र आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली मतमोजणी केंद्र व मतदान केंद्राची पाहणी • निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या दिल्या सूचना









 











जालना, दि.13 (जिमाका) :- 101 जालना आणि 102 बदनापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. वेद पती मिश्र आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज मतमोजणी केंद्र आणि मतदान केंद्राना भेट देवून पाहणी केली.

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, 101 जालना विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार छाया पवार तर 102 बदनापूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सरिता सुत्रावे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी डमरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी श्री. मिश्र आणि डॉ. पांचाळ यांनी 101 जालना विधानसभा मतदारसंघातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि 102 बदनापूर विधानसभा मतदार संघातील कृषि महाविद्यालय येथील मतमोजणी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी मतदान यंत्रे (इव्हीएम) सज्ज करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांनी उमेदवारांच्या नावासंदर्भात तपासणी करत एका मशीनवर ‘मॉकपोल’ करून व्हीव्हीपॅटद्वारे दिसणाऱ्या चिठ्ठीचीही खात्री करुन घेतली. तसेच स्ट्रॉन्ग रुमला भेट देवून रॅन्डमझायशेन प्रक्रियेनुसार मतदान यंत्रे (इव्हीएम) असल्याची देखील त्यांनी खात्री करुन घेतली.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शनिवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने निवडणूक निरीक्षक श्री. मिश्र आणि जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी मतमोजणी कक्षात करण्यात आलेल्या पुर्वतयारीची देखील यावेळी पाहणी केली. तसेच मतमोजणी कक्षातील मतमोजणी कर्मचारी आणि पोलींग एजंट यांच्या बैठक व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मतमोजणी केंद्रातील संपूर्ण परिसरात सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

यावेळी श्री. मिश्र आणि डॉ. पांचाळ यांनी यावेळी 101 जालना विधानसभा मतदारसंघातील जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्रातील मतदान केंद्र आणि 102 बदनापूर विधानसभा मतदारसंघातील सेलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रास भेट देवून पाहणी केली. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार केंद्रावर आवश्यक त्या सोयी-सुविधांचे नियोजन करण्याच्या संबंधीतांना मार्गदर्शक सूचना दिल्या.

-*-*-*-*-*-*-

Tuesday, 12 November 2024

निवडणूक विषयक राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण बंधनकारक : जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024


§       निवडणुकीच्या राजकीय जाहिरात प्रसारीत / प्रसिद्धीसाठी पूर्वप्रमाणीकरण आवश्यक

§       नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने जाहिरात प्रसारणाच्या तीन दिवसपूर्वी अर्ज सादर करणे आवश्यक

§       मुद्रीत माध्यमाद्वारे मतदान आणि मतदानाच्या पूर्वीच्या दिवशी प्रसिद्ध करावयाच्या जाहिरातीचे   

पूर्वप्रमाणीकरण करणे आवश्यक

§       अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने 7 दिवस आधी अर्ज करणे आवश्यक

 

जालना, दि.8 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने राजकीय जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण करण्याचे निर्देश दिले आहे. जालना जिल्हा विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक विषयक सर्व राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा समिती अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती या कक्षात कार्यान्वीत करण्यात आली आहे. उमेदवार व राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण करून घेण्यासाठी आपले अर्ज दिलेल्या मुदतीत माध्यम कक्षातील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे सादर करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. पांचाळ यांनी केले.

राजकीय प्रचाराच्या जाहिरातींबाबत भारत निवडणूक आयोगाने नियमावली निश्चित केली आहे. या नियमावलीनुसार राजकीय पक्ष व उमेदवारांना दूरचित्रवाणी वाहिन्या, केबल नेटवर्क, केबल वृत्तवाहिन्या, सिनेमा हॉल, रेडिओ, सार्वजनिक तसेच खासगी एफएम चॅनेल्स, सार्वजनिक ठिकाणी दाखविण्याच्या दृक-श्राव्य जाहिराती, ई-वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएस, रेकॉर्ड केलेले व्हॉईस संदेश, सोशल मीडिया, इंटरनेट संकेतस्थळावर दर्शविण्याच्या जाहिराती तसेच मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस अगोदर वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती ह्या देखील माध्यम प्रमाणिकरण आणि संनियंत्रण समितीकडून (एम.सी.एम.सी.) पूर्व प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी जाहिरात प्रसारित होण्याच्या तीन दिवस अगोदर जाहिरात प्रमाणीकरणासाठी जाहिरात व अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तर अनोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तींनी किमान सात दिवसापूर्वी समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अर्थात एम.सी.एम.सी. समिती ही अर्ज प्राप्त झाल्यानंतर तो अर्ज 48 तासात निकाली काढेल. जाहिरात नियमानुसार नसल्याचे समितीला आढळून आल्यास एम.सी.एम.सी. समितीला जाहिरात प्रमाणिकरण नाकारण्याचा अधिकार आहे. समितीच्या निर्णया विरुद्ध राज्य समितीकडे अपील करता येते. मात्र त्यानंतर केवळ सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल. समितीने जाहिरातीत बदल सुचविल्यानंतर समितीकडून तसा संदेश प्राप्त झाल्याच्या 24 तासात राजकीय पक्ष किंवा उमेदवाराने त्यानुसार दुरुस्त्या करून नवीन निर्मित केलेली जाहिरात प्रमाणीकरणासाठी सादर करणे आवश्यक आहे. जाहिरात प्रमाणीकरणासाठीचा अर्ज हा विहित नमुन्यात समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव व पत्ता, उमेदवार किंवा पक्षाचे नाव किंवा सदर जाहिरात एखादी संस्था - ट्रस्ट- संघटना यांच्याकडून दिली जात असल्यास त्यांचे नाव, मतदारसंघाचे नाव, राजकीय पक्षाचे मुख्यालयाचा पत्ता, ज्या चॅनल / केबल नेटवर्कवर जाहिरात प्रसारित करायची आहे, त्याबाबत स्पष्ट माहिती कोणत्या उमेदवाराच्या हितासाठी सदर जाहिरात करण्यात आली आहे, त्याबाबत माहिती, जाहिरात सादर करण्यात येत असल्याची दिनांक, जाहिरातीसाठी वापरण्यात आलेली भाषा, त्याच्या संहिता लेखनाच्या (ट्रास्कींसप) साक्षांकित दोन प्रती, जाहिरातीचे शिर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरात जर चॅनेलद्वारे प्रसारित केली जात असेल तर किती वेळा ती प्रसारित केली जाणार आहे, त्याचे प्रस्तावित केलेले दर, त्यासाठी लागलेला एकूण खर्च आदी सविस्तर माहिती अर्जदाराने निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमून्यात स्वाक्षरीसह सादर करणे आवश्यक आहे. आदर्श आचारसंहितेनुसार दिलेल्या निर्देशाचे जाहिरातीमध्ये पालन होणे आवश्यक आहे. या प्रामुख्याने राष्ट्रीय एकात्मतेला हानी पोहोचविणाऱ्या बाबी, धार्मिक भावना दुखावणे, भारतीय घटनेचा अवमान करणे, गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त करणे, कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण, महिलांचे चुकीचे चित्रण, तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थाच्या जाहिराती, हुंडा, बालविवाह यांना उत्तेजन देणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यास प्रतिबंध आहे. इतर देशावर टिका नसावी. न्यायालयाचा अवमान जाहिरातीतून होता कामा नये. राष्ट्रपती व न्याय संस्था यांच्याबाबत साशंकता नसावी. राष्ट्रीय एकात्मतेला, सौहार्दतेला आणि एकतेला बाधा पोहचविणारा मजकूर त्यामध्ये नसावा. सुरक्षा दलातील कोणतेही सैनिक, व्यक्ती, अधिकारी यांची अथवा सैन्यदलाचे छायाचित्र जाहिरातीत नसावे. कोणत्याही व्यक्तीच्या खाजगी / वैयक्तिक जीवनातील घटनांना धरुन त्यावर भाष्य नसावे. व्हिडीओ व्हॅनद्वारे प्रचारासाठी उपयोगात आणले जाणारे साहित्य याचे माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. या वाहनाची निवडणूक विभागाकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्या संमती शिवाय प्रचार करणाऱ्या जाहिराती देता येणार नाहीत. अनुमती शिवाय जाहिराती प्रकाशित झाल्यास प्रकाशकावर गुन्हा दाखल करण्यात येईल. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर मुद्रीत माध्यमाद्वारे प्रकाशित करावयाची जाहिरात प्रमाणीकरणसाठी समितीकडे दोन दिवस आधी जाहिरातीसह अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा समिती अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळविले आहे.

 ****