समाज कल्याणच्या
पुरस्कारासाठी अर्ज करावेत
जालना, दि.5 (जिमाका) :- सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित
करण्यात येते. सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांतील पुरस्कारांसाठी
इच्छुक पात्र संस्था तसेच उमेदवारांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जालना समाज कल्याणचे
सहायक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे
केले आहे.
समाजकल्याण क्षेत्रात सातत्याने
कार्यरत असलेल्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि वैयक्तिक स्तरावर उल्लेखनीय कार्य
करणारे समाजसेवक यामध्ये सहभागी होऊ शकतात. दोन्ही वर्षांच्या (2024-25 व 2025-26)
पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी कामाची गणना
1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024
या कालावधीतील कामगिरीवर आधारित असेल. वर्षासाठी आणि ज्या विशिष्ट पुरस्कारासाठी अर्ज
केला जात आहे, त्या पुरस्कारासाठी शासनाने विहित केलेल्या सर्व अटी व शर्तींची पूर्तता
करणे आवश्यक आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment