जालना, दि.20 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत राज्यातील
दिव्यांग व्यक्तींना सर्व कल्याणकारी सेवा आणि माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून
देण्यासाठी ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ हे
स्वतंत्र डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. या सिंगल विंडो सिस्टीममुळे आता
दिव्यांग बांधवांना विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे झाले असून, जालना
जिल्ह्यातील सर्व संबंधित संस्था आणि व्यक्तींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम. यांनी केले आहे.
या नवीन प्रणालीनुसार, जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात काम
करणाऱ्या सेवाभावी संस्थांची नोंदणी किंवा नूतनीकरण, नागरी समाज संघटनांची प्रक्रिया
आणि दिव्यांग विवाह योजनेसाठीचे अर्ज आता केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार
आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या कामांसाठी यापुढे कोणतेही ऑनलाईन अर्ज
स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज असा करा- इच्छुक संस्था आणि लाभार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in
भेट देऊन आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
दिव्यांगांच्या
सक्षमीकरणासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी हे पोर्टल अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून
जास्तीत जास्त नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे
करण्यात आले आहे. असेही कळविले आहे.
-*-*-*-*-
वृत्त क्र. 124
दि. 20 मार्च, 2026
जालना जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’;
वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता
जालना, दि.20 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात पुढील 24 तासांत पावसासह गारपीट होण्याची शक्यता
निर्माण झाली आहे. असे प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा मुंबई यांनी 20
मार्च रोजी दुपारी दिलेल्या अंदाजानुसार जालना जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी
करण्यात आला आहे. जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी
वारे वाहण्याची आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या
पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ मार्गदर्शक सूचना
जारी केल्या आहेत. विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी विनाकारण
घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः वीज कडकडत असताना झाडाखाली उभे
राहणे जीवावर बेतू शकते, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा किंवा ताडपत्रीने झाकून ठेवावा,
अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचेही
सांगण्यात आले आहे. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडणे किंवा तारा तुटण्याच्या घटना
घडू शकतात. त्यामुळे मोकळ्या मैदानात असलेल्या ट्रान्सफॉर्मर आणि लोंबकळणाऱ्या तारांपासून
दूर राहावे. वीज कडकडत असताना घरातील विद्युत उपकरणांचा वापर टाळणे हिताचे ठरेल, असेही
प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment