जालना, दि.2 (जिमाका):- छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी,
वैद्यकीय आणि सीईटी या परीक्षांचे मोफत
प्रशिक्षण दिले जाणार आहे. शासकीय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात
आदिवासी विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या
प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी हे पाऊल उचलले
आहे.
इयत्ता अकरावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता
नामवंत खासगी संस्थांमार्फत अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि सीईटी या परीक्षांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकात्मिक आदिवासी
विकास प्रकल्पांतर्गत हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. शासकीय आश्रमशाळा,
अनुदानित शाळा, EMRS आणि जिल्हा परिषद शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांनी विहीत
नमुन्यातील अर्ज तातडीने भरणे आवश्यक आहे. हे अर्ज प्रकल्प कार्यालय किंवा संबंधित
मुख्याध्यापकांकडे मोफत उपलब्ध असून ते भरून तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात
आले आहे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment