जालना,दि.16(जिमाका) : आगामी जनगणना
2027 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक पूर्वतयारीच्या अनुषंगाने येथील जिल्हाधिकारी
कार्यालयातील महसुल सभागृहात तीन दिवसीय प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी
जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते आज सुरुवात झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी
शशिकांत हदगल, तहसिलदार छाया पवार यांच्यासह जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक अजय
ठाकुर आणि विशाल दिवेकर हे मुख्य प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी
रमेश मिसाळ मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जनगणना कार्य संचालनालय, महाराष्ट्र यांच्या
वतीने जनगणना-2027 संदर्भातील कार्यवाही सुरू झाली असून, ही जनगणना दोन टप्प्या मध्ये
होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना करण्यात येणार असून, दुसऱ्या
टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील
चार्ज अधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी तसेच जनगणनेशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी
पहिल्या टप्प्यातील घरांची यादी तयार करणे, लोकसंख्या गणना आदी विषयावर तीन दिवसीय
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व प्रशिक्षणार्थीनी
या तीन दिवसीय जनगणना प्रशिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल जनगणनेबाबत असेलेल्या आपल्या
समस्या तसेच प्रश्नांचे निराकरण करुन घ्यावे, असे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी
शशिकांत हदगल यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनामागील उद्देश आणि महत्त्व स्पष्ट
करत पहिल्यांदाच डिजीटल जनगणना होत असल्याचे सांगितले. तसेच जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात
घरांची यादी आणि घरांची गणना माहिती संकलित केली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष
लोकसंख्येची गणना करण्यात येणार आहे. जनगणनेचे हे काम अत्यंत महत्त्वाचे असुन, या तीन
दिवसीय प्रशिक्षण शिबिरात दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्वांनी काम करावे. या तीन दिवसीय
प्रशिक्षणात जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक अजय ठाकुर आणि विशाल दिवेकर हे प्रशिक्षणार्थीना
जनगणना प्रक्रियेतील घरांची यादी माहिती संकलनाची पद्धत तसेच डिजिटल माध्यमातून माहितीची
नोंदणी, तसेच जनगणना-2027 च्या अनुषंगाने 1 मे, 2026 ते 15 मे, 2026 या कालावधीत स्व-गणना
(Self Enumeration) आणि 16 मे, 2026 ते 14 जून, 2026 दरम्यान घरोघरी जाऊन भेट देणे
आदी मुद्यांबाबत सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देवून सविस्तर मार्गदर्शन करणार
आहेत. तसेच जनगणना कार्यातील विविध बाबी, माहिती संकलनाची प्रक्रिया तसेच क्षेत्रीय
पातळीवरील अंमलबजावणीबाबत देखील सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी
जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच संबंधित अधिकारी
व कर्मचारी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण शिबिराच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
इमारतीत सुरु करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जनगणना कक्षाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी
तथा प्रभारी जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
-*-*-*-*-
वृत्त क्र. 115 दि.
16 मार्च, 2026
क्रीडा ई- प्रमाण
खेळाडूच्या पाच टक्के आरक्षणासाठी
प्रणालीवर नोंदणी करून घरबसल्या प्रमाणपत्र मिळवा
जालना दि. 13 (जिमाका) :- महाराष्ट्र
राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये 5% आरक्षणाचा लाभ अधिक
सुलभ पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालयाने क्रीडा प्रमाण
ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. प्रणालीचे
वैशिष्ट्य आणि महत्व *ब्लॉकचेन तंत्रज्ञान:
ही प्रणाली ब्लॉगचेन (Blockchain) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने या
मध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप किंवा फेरफार करणे शक्य नाही ज्यामुळे बोगस
प्रमाणपत्रांना पूर्णपणे आळा बसेल. *त्वरित
पडताळणी: खेळाडूंनी माहिती भरल्यानंतर आणि मूळ डेटांशी ती जुळल्यास अवघ्या 24 तासाच्या
आत डिजिटल पडताळणी अहवाल होतो. *क्यू आर कोड सुरक्षा: प्रत्येक प्रमाणपत्रावर एक अद्वितीय
किंवा कोड असेल जो स्कॅन करून संबंधित नियुक्त प्राधिकरण (उदा. MPSC पोलीस भरती) प्रमाणपत्राची
सत्यता त्वरित पाठवू शकते . आगामी पदभरतीसाठी क्रीडा एक प्रमाणपत्र बंधनकारक महाराष्ट्र
लोकसेवा आयोग (MPSC) तसेच सर्व शासकीय पद भरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता या क्रीडा
ही प्रमाणपत्राची प्रत जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे या प्रमाणपत्राशिवाय खेळाडूंनी
संवर्गातून अर्ज विचार केला जाणार नाही याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. ज्या खेळाडूंनी
यापूर्वी विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्राची पडताळणी केली
आहे त्यांनी यापुढे शासकीय व शासकीय भरतीसाठी अर्ज सादर करायचा असल्यास या प्रणाली
द्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धत
या प्रणाली अंतर्गत 5% खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख क्रीडा इ प्रमाण
पोर्टलवर यशस्वीरित्या अपलोड करण्यात येत आहे या अभिलेखाद्वारे खेळाडू आपले पाच टक्के
खेळाडू प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतात यासाठी आवश्यक असणारा तपशील पुढील प्रमाणे.
खेळाडूंना पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य ज्या खेळाडूंनी
अधिकृत स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवले आहे अशा सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या अधिकृत
संकेतस्थळावर ला https://sport.maharashtra.gov.
* आपण सहभागी झालेल्या स्पर्धेचे
अचूक नाव व वर्ष नमूद करावे. * आपल्याकडे
उपलब्ध असलेल्या मूळ क्रीडा प्रमाणपत्रा ची स्कॅन केलेली प्रत निवेदनासोबत जोडावी असे
अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभाग स्तरावरच्या त्या माहितीची शहानिशा करून सदर अभिलेख
पोर्टलवर अद्यावत करण्याची कारवाई केली जाईल. अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनात सूचनांसाठी
खेळाडूंनी या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अन्य खेळाच्या अभिलेख प्रणालीवर उपलब्ध
करून दिल्यानंतर त्याबाबत माहिती त्वरित याद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात
येईल. महत्वाची सूचना:-कबड्डी फेन्सिंग ट्रायलॉन 2025 ची स्पर्धा जुडो 2024 ची स्पर्धा
कोराश 2024 25 व 2017 18 या स्पर्धेचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याच खेळाडूंना प्रमाणपत्रासाठी
अर्ज करावेत इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी नोंदणी करावी इतर अभिलेख देखील अपलोड करण्याची
कारवाई सुरू आहे. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले
आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment