Friday, 6 March 2026

जालना जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-1 शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा प्रयत्न करणार - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल जालना, दि. 6 (जिमाका) :- महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" टप्पा 1 आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीत आयोजित शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा प्रयत्न करणार आहेत असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. दि. 5 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाभरात दि. 7 मार्च 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वव समाधान शिबीर अभियान टप्पा 1 च्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुकेशिनी कांबळे-पगारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वव समाधान शिबिरांच्या माध्यमातून शासनाकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजना तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय व योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबीरा दरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित समस्या या शिबिरांच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या, अडचणी, तक्रारी ह्या मंडळ अधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक राहील. संबंधित मंडळात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच या शिबीरा दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून जालना जिल्ह्यात एकूण 65 ठिकाणी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आयोजित करण्यात येणार असून मंडळ स्तरावर या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शिबिरात महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांची तात्काळ दखल घेतील. 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत मंडळ व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर राबविण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढणे हा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक तालुक्यात एकदिवसीय समाधान शिबिरे आयोजित करून प्रलंबित फेरफार, 7/12 दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ तत्त्वावर देण्यात येणार आहेत.अभियानाच्या पूर्वतयारीत गावनिहाय प्रलंबित प्रकरणांची यादी तयार करून शिबिरापूर्वी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. ७/१२ व ८अ उताऱ्यांचे अद्ययावतीकरण, डिजिटल ७/१२ ची जनजागृती, तसेच एकवेळच्या अधिमूल्य भरणा पद्धतीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, संपादन व अकृषी परवानगी नोंदींची अद्ययावत माहिती शिबिरात उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘एक खिडकी व्यवस्था’ प्रभावीपणे राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील .शिबिरांची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे व दवंडीचा वापर करण्यात येणार आहे. *अभियानातंर्गत शिबीरांची पूर्व तयारी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना :* अ) शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग २ जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तित करण्यात आल्या किंवा नाहीत याची तपासणी मंडळ स्तरावर करणे व अशा काही जमिनी वर्ग १ मध्ये परावर्तित करणे बाकी असल्यास त्याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पुर्ण करावी व अद्यावत नोंदीसह ७/१२ लाभार्थ्यांना वितरीत करावे. ब) जिवंत ७/१२ मोहिमेअंतर्गत यापुर्वीच शासनामार्फत सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व गावा मध्ये ७/१२ वाचन पूर्ण करून प्रलंबीत नोंदीच्या याद्या तयार कराव्या व त्याअनुषंगाने दुरूस्तीबाबत कार्यवाही शिबीरापुर्वी पुर्ण करून घेणे. शिबीरात अद्यावत अभिलेख अर्जदारांना उपलब्ध करून द्याव्या. क) सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबीरापुर्वी भरून घेणे व समितीच्या बैठकीचे आयोजन करून लाभ मंजुर करून घ्यावे व शिबीरात मंजुरी आदेशाचे वितरण करावे. ड) तुकडेबंदी कायद्याविरूध्द दिनांक १५.११.१९६५ ते १५.१०.२०२४ पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरण बाबत गावनिहाय यादी तयार करावी. इ) नोंदणीकृत दस्ताचे आधारे रद्द झालेली, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लघंनामुळे ७/१२ मधील इतर अधिकारातील खरेदीदारांचे नाव, इतर अधिकारात नोंदविलेले शेरे, तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे. अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गाव निहाय माहिती गोळा करून नोंदणीकरीता नोंदणी विभागाकडे पाठविणे. ७/१२ अद्यावत करून शिबीराच्या दिवशी अद्यावत ७/१२ चे वाटप करावे ई) मंडळ स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करणे. शाळेमध्ये Camp Mode वर विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून घेणे. शिबीराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करावे. उ) उपविभागीय स्तरीय समितीने शासन निर्णय क्र.लवेसू२०२५/प्र.क्र.०२/पाणंद रस्ते, दिनांक १४/१२/२०२५ नुसार शिर्बीर आयोजित करावायाच्या मंडळातील पाणंद रस्त्यांची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करुन द्यावे. ऊ) मंडळातील सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे. तसेच संबंधीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी व शिबीरात पट्टे वाटप करावे. *समाधान शिबीर - प्रमुख वैशिष्ट्ये* *शिबीर स्थळी मिळणार १५ पेक्षा जास्त महसुली सेवा* * प्रलंबित फेरफार * ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती *डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उता-यांचे वाटप *उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र * नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र * अकृषिक (NA) परवानगी * अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा * नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती * सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे * विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप * तुकडेबंदी कायद्यांच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा * घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज * अॅग्रीस्टॅक आणि पी. एम. किसान नोंदणी * भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत केली जाणार *अभियानाची विशेष उद्दिष्टे* * दिव्यांग व्यक्तिंना कृत्रीम अवयव वाटप * शासन मंजूर घरकुल लाभार्थीना प्रत्येकी ५ ब्रास वाळु वाटप * एकल महिलांना सर्व लाभ एका ठिकाणी देणे. * असंघटीत कामगारासाठी विशेष आरोग्य शिबीर * कृषी विभाग विविध योजना माहिती व प्रधानमंत्री माती परीक्षण योजना शिबीर * आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड बाबत मार्गदर्शन करणे *जिल्हातील शिबीरांचे ठिकाण व दिनांक :- 7 मार्च 2026 जालना- देवमूर्ती, बदनापूर- बावणे पांगरी, अंबड-जामखेड, घनसावंगी-कुंभार पिंपळगाव, परतुर- आष्टी, मंठा- पांगरी गोसावी, भोकरदन- राजुर, जाफ्राबाद-माहोरा 14 मार्च 2026- जालना- नेर, बदनापूर- रोषणगाव, अंबड-धनगर प्रिंप्री, घनसावंगी-राणी उंचेगाव, परतुर- श्रीष्टी, मंठा-तळणी, भोकरदन- जानेफळ दाभाडी, जाफ्राबाद-कोळेगाव . 22 मार्च 2026- जालना- सावंगी तलाव, अंबड- शहागड, घनसावंगी- रांजणी, भोकरदन- धावडा. 28 मार्च 2026- जालना-विरेगाव, बदनापूर-शेलगाव, अंबड- वडीगोद्री, भोकरदन- आव्हाना. 6 एप्रिल 2026- जालना- रामनगर, भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई 10 एप्रिल 2026 जालना- वाघ्रुळ जहागीर, बदनापूर- चिखली, अंबड-ताड हदगाव, घनसावंगी-पानेवाडी, परतुर- वाटुर, मंठा-ढोकसाळ, भोकरदन- केदारखेडा, जाफ्राबाद- टेंभुर्णी 17 एप्रिल 2026- जालना- पाचन वडगाव, बदनापूर- दाभाडी, अंबड-गोंदी, घनसावंगी-अंतरवाली टेंभी, परतुर- सातोना खुर्द, मंठा- माळतोंडी, भोकरदन- हसनाबाद, जाफ्राबाद-वरुड बुद्रुक. 24 एप्रिल 2026- जालना-सेवली, बदनापूर- बदनापूर ग्रामीण, अंबड-सुखापुरी, घनसावंगी-जांब समर्थ,परतुर- परतुर ग्रामीण, मंठा- जयपूर, भोकरदन- दानापूर, जाफ्राबाद- कुंभारझरी. 2 मे 2026- जालना- गोलापांगरी, अंबड- रोहिलागड, परतुर-कोकाटे हदगाव, मंठा- मंठा शहर, भोकरदन- सिपोरा बाजार. 8 मे 2026- जालना मनपा, बदनापूर नगर पंचायत, नगर परिषद अंबड, नगर पंचायत तिर्थपुरी,नगर परिषद परतुर, नगर पंचायत मंठा, नगर परिषद भोकरदन, नगर पंचायत जाफ्राबाद. 15 मे 2026- नगर पंचायत घनसावंगी, भोकरदन- आन्वा जिल्हातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. -*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-1

शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या

सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा प्रयत्न करणार

-         जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

जालना, दि. 6 (जिमाका) :- महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान" टप्पा 1 आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीत आयोजित शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा प्रयत्न करणार आहेत असे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.

दि. 5 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाभरात दि. 7 मार्च 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वव समाधान शिबीर अभियान टप्पा 1 च्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, प्रभारी उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सुकेशिनी कांबळे-पगारे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत पुढे बोलतांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वव समाधान शिबिरांच्या माध्यमातून शासनाकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण योजना तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय व योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबीरा दरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित समस्या या शिबिरांच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या, अडचणी, तक्रारी ह्या मंडळ अधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक राहील. संबंधित मंडळात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच या शिबीरा दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून जालना जिल्ह्यात एकूण 65 ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आयोजित करण्यात येणार असून मंडळ स्तरावर या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शिबिरात महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांची तात्काळ दखल घेतील. 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत मंडळ व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर राबविण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढणे हा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक तालुक्यात एकदिवसीय समाधान शिबिरे आयोजित करून प्रलंबित फेरफार, 7/12 दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ तत्त्वावर देण्यात येणार आहेत.अभियानाच्या पूर्वतयारीत गावनिहाय प्रलंबित प्रकरणांची यादी तयार करून शिबिरापूर्वी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. ७/१२ व ८अ उताऱ्यांचे अद्ययावतीकरण, डिजिटल ७/१२ ची जनजागृती, तसेच एकवेळच्या अधिमूल्य भरणा पद्धतीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, संपादन व अकृषी परवानगी नोंदींची अद्ययावत माहिती शिबिरात उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘एक खिडकी व्यवस्था’ प्रभावीपणे राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील .शिबिरांची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे व दवंडीचा वापर करण्यात येणार आहे. *अभियानातंर्गत शिबीरांची पूर्व तयारी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना :* अ) शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग २ जमिनी भोगवटदार वर्ग १ मध्ये परावर्तित करण्यात आल्या किंवा नाहीत याची तपासणी मंडळ स्तरावर करणे व अशा काही जमिनी वर्ग १ मध्ये परावर्तित करणे बाकी असल्यास त्याबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पुर्ण करावी व अद्यावत नोंदीसह ७/१२ लाभार्थ्यांना वितरीत करावे. ब) जिवंत ७/१२ मोहिमेअंतर्गत यापुर्वीच शासनामार्फत सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व गावा मध्ये ७/१२ वाचन पूर्ण करून प्रलंबीत नोंदीच्या याद्या तयार कराव्या व त्याअनुषंगाने दुरूस्तीबाबत कार्यवाही शिबीरापुर्वी पुर्ण करून घेणे. शिबीरात अद्यावत अभिलेख अर्जदारांना उपलब्ध करून द्याव्या. क) सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबीरापुर्वी भरून घेणे व समितीच्या बैठकीचे आयोजन करून लाभ मंजुर करून घ्यावे व शिबीरात मंजुरी आदेशाचे वितरण करावे. ड) तुकडेबंदी कायद्याविरूध्द दिनांक १५.११.१९६५ ते १५.१०.२०२४ पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमीनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरण बाबत गावनिहाय यादी तयार करावी. इ) नोंदणीकृत दस्ताचे आधारे रद्द झालेली, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लघंनामुळे ७/१२ मधील इतर अधिकारातील खरेदीदारांचे नाव, इतर अधिकारात नोंदविलेले शेरे, तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे. अनोंदणीकृत व्यवहाराविषयी गाव निहाय माहिती गोळा करून नोंदणीकरीता नोंदणी विभागाकडे पाठविणे. ७/१२ अद्यावत करून शिबीराच्या दिवशी अद्यावत ७/१२ चे वाटप करावे ई) मंडळ स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करणे. शाळेमध्ये Camp Mode वर विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज भरून घेणे. शिबीराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करावे. उ) उपविभागीय स्तरीय समितीने शासन निर्णय क्र.लवेसू२०२५/प्र.क्र.०२/पाणंद रस्ते, दिनांक १४/१२/२०२५ नुसार शिर्बीर आयोजित करावायाच्या मंडळातील पाणंद रस्त्यांची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करुन द्यावे. ऊ) मंडळातील सर्वांसाठी घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे. तसेच संबंधीत शासन निर्णयातील तरतुदीनुसार पुर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी व शिबीरात पट्टे वाटप करावे.

*समाधान शिबीर - प्रमुख वैशिष्ट्ये* *शिबीर स्थळी मिळणार १५ पेक्षा जास्त महसुली सेवा* * प्रलंबित फेरफार * ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती *डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उता-यांचे वाटप *उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र * नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र * अकृषिक (NA) परवानगी * अकृषिक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा * नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती * सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे * विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप * तुकडेबंदी कायद्यांच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा * घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज * अॅग्रीस्टॅक आणि पी. एम. किसान नोंदणी * भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्यावत केली जाणार *अभियानाची विशेष उद्दिष्टे* * दिव्यांग व्यक्तिंना कृत्रीम अवयव वाटप * शासन मंजूर घरकुल लाभार्थीना प्रत्येकी ५ ब्रास वाळु वाटप * एकल महिलांना सर्व लाभ एका ठिकाणी देणे. * असंघटीत कामगारासाठी विशेष आरोग्य शिबीर * कृषी विभाग विविध योजना माहिती व प्रधानमंत्री माती परीक्षण योजना शिबीर * आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड बाबत मार्गदर्शन करणे

*जिल्हातील शिबीरांचे ठिकाण व दिनांक :- 7 मार्च 2026 जालना- देवमूर्ती, बदनापूर- बावणे पांगरी, अंबड-जामखेड, घनसावंगी-कुंभार पिंपळगाव, परतुर- आष्टी, मंठा- पांगरी गोसावी, भोकरदन- राजुर, जाफ्राबाद-माहोरा 14 मार्च 2026- जालना- नेर, बदनापूर- रोषणगाव, अंबड-धनगर प्रिंप्री, घनसावंगी-राणी उंचेगाव, परतुर- श्रीष्टी, मंठा-तळणी, भोकरदन- जानेफळ दाभाडी, जाफ्राबाद-कोळेगाव . 22 मार्च 2026- जालना- सावंगी तलाव, अंबड- शहागड, घनसावंगी- रांजणी, भोकरदन- धावडा. 28 मार्च 2026- जालना-विरेगाव, बदनापूर-शेलगाव, अंबड- वडीगोद्री, भोकरदन- आव्हाना. 6 एप्रिल 2026- जालना- रामनगर, भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई 10 एप्रिल 2026 जालना- वाघ्रुळ जहागीर, बदनापूर- चिखली, अंबड-ताड हदगाव, घनसावंगी-पानेवाडी, परतुर- वाटुर, मंठा-ढोकसाळ, भोकरदन- केदारखेडा, जाफ्राबाद- टेंभुर्णी 17 एप्रिल 2026- जालना- पाचन वडगाव, बदनापूर- दाभाडी, अंबड-गोंदी, घनसावंगी-अंतरवाली टेंभी, परतुर- सातोना खुर्द, मंठा- माळतोंडी, भोकरदन- हसनाबाद, जाफ्राबाद-वरुड बुद्रुक. 24 एप्रिल 2026- जालना-सेवली, बदनापूर- बदनापूर ग्रामीण, अंबड-सुखापुरी, घनसावंगी-जांब समर्थ,परतुर- परतुर ग्रामीण, मंठा- जयपूर, भोकरदन- दानापूर, जाफ्राबाद- कुंभारझरी. 2 मे 2026- जालना- गोलापांगरी, अंबड- रोहिलागड, परतुर-कोकाटे हदगाव, मंठा- मंठा शहर, भोकरदन- सिपोरा बाजार. 8 मे 2026- जालना मनपा, बदनापूर नगर पंचायत, नगर परिषद अंबड, नगर पंचायत तिर्थपुरी,नगर परिषद परतुर, नगर पंचायत मंठा, नगर परिषद भोकरदन, नगर पंचायत जाफ्राबाद. 15 मे 2026- नगर पंचायत घनसावंगी, भोकरदन- आन्वा जिल्हातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment