जालना, दि. 16 (जिमाका): जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
अध्यक्ष आशिमा मित्तल व निवासी
उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली
आज जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड येथे जिल्हास्तरीय आपत्ती
व्यवस्थापन शोध व बचाव साहित्य हाताळणी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न
झाला.
या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात आले होते. जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर परिषद व
नगर पंचायत अग्निशमन विभाग तसेच होमगार्डस् दलातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन
परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक आधुनिक शोध व बचाव साहित्य
हाताळणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणाचा मुख्य
उद्देश पूर, जलदुर्घटना तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित व सुरक्षित
बचावकार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणांची कार्यक्षमता वाढविणे हा होता.
प्रशिक्षणादरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत नव्याने खरेदी
करण्यात आलेल्या विविध आपत्कालीन साहित्याच्या वापर, देखभाल व सुरक्षित
हाताळणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये पुढील साहित्याचा समावेश
होता :
• फायबर बोट – ४
• रबर बोट – ३
• स्कुबा सेट – २
• फायर जेल ब्लँकेट – २०
• लाईफबोये – १००
• बॅटरी कटर – ९
• बॅटरी स्प्रेडर – ९
• फ्लोटींग पंप – १०
• पोर्टेबल जनरेटर – ४
• पोर्टेबल पंप – १०
• मेगाफोन – २०
• सेफ्टी नेट – १०
• लाईफ जॅकेट – २२५
• रिफ्लेक्टर जॅकेट – २२५
सदर साहित्य मनपा तसेच
जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत अग्निशमन विभागांना उपलब्ध करून देण्यात
आले असून, आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात
उपयोग होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
मा.जिल्हाधिकारी श्रीमती. आशिमा मित्तल या होत्या. यावे मा.अपर जिल्हाधिकारी
श्री. रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण श्री. शशिकांत हदगल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी श्री. दिपक काजळकर, प्रभारी अग्निशमन अधिकारी, मनपा जालना श्री. संदीप
दराडे तसेच मनपा जालना अग्निशमन विभाग, भोकरदन, परतूर व अंबड नगर परिषद अग्निशमन
विभाग, बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी व तिर्थपुरी नगर पंचायत विभाग आणि
होमगार्डस् विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****



No comments:
Post a Comment