Friday, 6 February 2026

अमृतच्या उ‌द्योगविषयक प्रशिक्षणाचे आयोजन; 9 फेब्रुवारीपासून होणार जालना येथे सुरुवात

 


 

जालना, दि. 6 (जिमाका) :- जिल्ह्यातील युवक-युवती व उ‌द्योजकांसाठी स्वयंरोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध करून देणारे उ‌द्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण, लघु उ‌द्योग प्रशिक्षण सोमवार दि.9  फेब्रुवारी 2026 पासून जालना येथे सुरू होत आहे. तरी जालना जिल्ह्यातील नवीन उ‌द्योग सुरु करू इच्छिणाऱ्या युवक-युवती व उ‌द्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणात नवीन व्यवसाय सुरू करणे तसेच चालू व्यवसायाचा विस्तार यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. उद्योग उभारणीच्या मूलभूत संकल्पना, योग्य व्यवसाय निवड, उत्पादन प्रक्रिया, खर्च नियंत्रण, नफा व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रेडिंग व ट्रेडमार्क नोंदणी यासह शासकीय योजनांचा उ‌द्योगासाठी प्रभावी वापर कसा करावा, याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

डिजीटल युगाची गरज लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थीना 'अमृत पेठ' या ई-कॉमर्स विक्री माध्यमाची ओळख करून देण्यात येणार असून, त्याद्वारे जालना जिल्ह्यातील लघु उ‌द्योगांची उत्पादने संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक उ‌द्योगांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध होऊन रोजगार निर्मितीस चालना मिळेल. अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना घेता येणार असून, वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेले जालना जिल्ह्यातील पात्र नागरिक या प्रशिक्षणासाठी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी  महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे- 7391065474, जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी - 9421944752 यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                          दि. 6 फेब्रुवारी  2026

 

जिल्हा कारागृहात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न  

 

जालना, दि. 6 (जिमाका) :- जालना जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह बंदीची गुरुवार दि.5 फेब्रुवारी 2026 रोजी शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबीराचे आयोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील,डॉ.प्रदीप कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण 75 जणांची आरोग्य तपासणी करुन औषधी  वाटप करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गाडेकर, कारागृह अधिक्षक प्रविण विभांडीत, वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रज्ञा कुलकर्णी,  डॉ. ओम ढाकणे यांच्यासह कारागृहातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. असे कळविले आहे.

-*-*-*-*-

वृत्त क्र.                                                                          दि. 6 फेब्रुवारी  2026

 

18 फेब्रुवारी रोजी पेंशन अदालत

जालना दि. 6 (जिमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत.  त्यानूसार पेंशन अदालत दि.18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे.

आपली प्रकरणे पेंशन अदालतीमध्ये ठेवण्यासाठी सेवानिवृत्तांनी प्रलंबित प्रश्न, अर्ज, पोस्टाने, ई-मेल किंवा हस्तपोच जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात दि.12 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावेत. तरी पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment