जालना दि. 3 (जिमाका):- महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
परीक्षा इयत्ता 12 वी दि. 10 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 मार्च 2026 या कालावधीत
जिल्ह्यातील एकुण 79 परीक्षा केंद्रांवर तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा
इयत्ता 10 वी दि. 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील
एकुण 102 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणर आहे.
वरील परीक्षा केंद्राच्या परिसरात
अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
होण्याची शक्यता असल्याने नमुद परीक्षा उपकेंद्रांच्या 200 मीटर परिसरात कायदा व
सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करुन प्रतिबंधात्मक
कार्यवाही करण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशीत केले आहे.
या
आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी आदेशात नमुद
कालावधीत सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी
बुथ/फॅक्स/ झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश
परीक्षेच्या दिवशी सकाळी 8.00 वाजेपासुन
सायंकाळी 8.00 वाजेपर्यंत अंमलात
राहील.
-*-*-*-*-*-*
No comments:
Post a Comment