जालना, दि.19 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्तात भिती नावाच्या पेशी नव्हत्या त्यामुळे ते
प्रत्येक काम कुठल्याही भीतीविना करत असत. शिवरायांचे स्मरण केल्यास आत्मविश्वास निर्माण
होत असल्याचे प्रतिपादन आ. अर्जुन खोतकर यांनी केले.
सांस्कृतिक कार्य संचालनालय,
मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 18 व 19 फेब्रुवारी,
2026 रोजी जालना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य कर्तृत्व व शौर्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे येथील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी
श्री. खोतकर बोलत होते.
यावेळी महापौर वंदना मगरे,
उपमहापौर राजेश राऊत, जिल्हा परिषदच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी
शशिकांत हदगल उपजिल्हाधिकारी रोहयो मनिषा दांडगे, उप विभागीय अधिकारी जालना रामदास
दौंड, तहसीलदार जालना छाया पवार, अतिरिक्त आयुक्त जालना शहर महानगरपालिका अर्जुन गिराम,
उपायुक्त जालना शहर महानगरपालिका नंदा गायकवाड, तहसीलदार बदनापूर अतुल बने यांची उपस्थिती
होती.
श्री. खोतकर पुढे म्हणाले
की, स्वराज्य म्हणजे सत्ता नव्हे, स्वाभिमान आहे हे शिवरायांनी आपल्या कार्यशैलीतून
दाखवून दिले. शिवाजी महाराजांनी त्या काळी लोकाभिमुख प्रशासनाची निर्मिती करुन गुड
गव्हर्नस चा पाया रचला होता. शिवरायांनी शिस्तबद्ध, जलद व गतीमान प्रशासनाचा पाया रचला.
शिवरायांची चिकीत्सकवृत्ती, निरीक्षण क्षमता, उत्कृष्ट कौशल्य, उत्तम अर्थतज्ञ यासह
अन्य व्यक्तीमत्त्व विकसनाचे पैलू, उत्कृष्ट युद्धनिती, आधुनिक विचार सरणी हे त्यांचे
वाखाणण्याजोगे गुण होते.
आज शाहीर रामानंद उगले यांनी
शिवजन्माचा पोवाडा, माता जिजाऊने
शिवरायांना कसे घडवले याबाबतचा पोवाडा, अफजलखानाचा वधाचा पोवाडा, दोनच राजे इथे गाजले,
गाडी गुंगराची हे पोवाडेचे बहारदार सादरीकरण केले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी या
कार्यक्रमास प्रतिसाद दिला.
**-*-*-*-*-*-*-



No comments:
Post a Comment