जालना, दि.10 (जिमाका) : जिल्हा सूचना विज्ञान केंद्र (NIC) यांनी ‘सेफर इंटरनेट डे’ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन, येथे आज इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदारीने वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी तज्ञ प्रा. संदिप काळे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शासकीय कामकाजात तसेच
वैयक्तिक स्तरावर इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी आणि तांत्रिक बाबींबाबत माहिती
देणे हा आहे. सर्व शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान केंद्र यांनी
केले आहे.
या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकरी शशिकांत हदगल,
प्रा. संदीप काळे, जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे भूषण लोखंडे, रामेश्वर भोसले,
दिपेंद्र जयस्वाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती
होती.
-*-*-*-*-*-*-*-

.jpeg)
No comments:
Post a Comment