जालना, दि. 11
(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य
सैनिक कल्याण विभाग आणि त्याअंतर्गत असलेल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील
रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या विभागातील 'लिपीक टंकलेखक' (गट-क) या संवर्गातील
एकूण 72 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा टीसीएसमार्फत
दि.14 मार्च 2026 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. दि. 11 जानेवारी, 2026
सोमवारी महिला लोकशाही दिन
जालना
दि. 11 (जिमाका) :- महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि
त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या
उद्देशाने, जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, दि.16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत 'जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे'
आयोजन करण्यात आले आहे.
ज्या महिलांना आपल्या तक्रारी किंवा प्रश्न
मांडायचे आहेत, त्यांनी आपले अर्ज दोन
प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जालना येथे सादर
करावेत. महिलांनी प्रथम संबंधित तहसीलदार यांच्याकडे लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी
तक्रार नोंदवावी. तालुका स्तरावर तक्रार केल्यानंतर एका महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास, संबंधित महिला जिल्हास्तरीय
लोकशाही दिनात आपली तक्रार मांडू शकतात. तहसीलदार आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी
यांनी तक्रारदारास एका महिन्याच्या आत अंतिम उत्तर देणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील पिडीत महिलांनी आपल्या
तक्रारींसाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी
कार्यालय किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या
उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,
जालना यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
-*-*-*-*-
वृत्त
क्र. दि. 11 जानेवारी, 2026
'मुख्यमंत्री माझी लाडकी
बहीण' योजना;
ई-केवायसीसाठी पोर्टल पुन्हा
सुरू
जालना दि. 11 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व
बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतील ज्या लाभार्थी महिलांच्या
ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक चुका झाल्या आहेत, अशा महिलांसाठी सुधारणा करण्याची
संधी दि.31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी
मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील त्रुटीची सुधारणा करुन या या योजनेचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा
अर्ज भरताना किंवा ई-केवायसी
प्रक्रिया पूर्ण करताना अनेक महिलांनी कुटुंबातील सदस्यांच्या
नोकरीविषयक माहितीमध्ये नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला आहे. विशेषतः कुटुंबातील
सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत नियमित/कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत किंवा कसे? तसेच कुटुंबातील
सदस्य सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत
किंवा कसे? या पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकांमुळे पात्र महिलांना लाभ
मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment