जालना, दि.3 (जिमाका): जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना अंतर्गत किमान कौशल्य
विकास कार्यक्रम सन 2025-26 मध्ये प्रशिक्षण राबविण्यासाठी इच्छुक व पात्र प्रशिक्षण
संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. नॅशनलत स्कील डेव्हलपमेंट कॉरपोरेशन
(NSDC) यांचेकडील Skill India Digital Hub या पोर्टलवर सूचीबद्ध (Listed) असलेल्या
प्रशिक्षण संस्था या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास पात्र राहणार आहेत.
प्रस्ताव
सादर करण्यासाठी आवश्यक विहित नमुन्यातील परिशिष्टे तसेच मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांची
यादी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयाच्या
नोटीस बोर्डावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक प्रशिक्षण संस्थांनी
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना
या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रं. ०२४८२-२९९०३३ वर कार्यालयीन वेळेत संपर्क
करून विहित नमुन्यात परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दि. 16 फेब्रुवारी,
20265पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment