जालना, दि.3 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय
वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाधार योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार
देय असलेली रक्कम विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेसाठी
संबधित लाभार्थ्याना त्रुटी पुर्तता करण्याबाबतचे पत्र संबधीत लाभार्थ्यांच्या मुळ
पत्यावर पाठविण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी वेळोवेळी अंतीम संधी त्रुटीपुर्तता करण्याबाबत
कळविण्यात आलेले आहे.
सन
2022-23 ते 2023-24 या आर्थीक वर्षातील विद्यार्थ्याना अंतीम संधी म्हणून दि. 10 फेब्रूवारी,
2026 पर्यतच्या मुदतीत आपल्या अर्जातील त्रुटी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर कराव्यात.
संबधित कालावधीतील
लाभार्थी यांनी विहित मुदतीत त्रुटी पुर्तता सादर न केल्यास सदरील अर्ज नस्तीबदध् करण्यात
येतील. व त्यानंतर सन 2022-23 ते 2023-24 या
कालावधीतील कोणत्याही विद्यार्थ्याना त्रुटी पुर्ततेची संधी दिली जाणार नाही. तसेच
कोणताही विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचीत राहिल्यास त्यास समाज कल्याण,
जालना कार्यालय जबाबदार राहणार नाही.
त्याअनुषगांने
सन 2022-23 ते 2023-24 वर्षामध्ये अर्ज सादर केलेल्या (फ्रेश व नुतनीकरण) ज्या विद्यार्थ्यांनी
अद्यापपर्यत त्रुटीची पुर्तता केलेली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या संचीका नस्तीबध्दं
करण्यात येतील यांची सर्व लाभार्थ्यानी नोंद घ्यावी. असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण,
जालना राजु एडके यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment