Friday, 31 January 2025

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करावेत

जालना, दि.31 (जिमाका) :- जिल्ह्यातील जालना तालुक्यातील सेवली, देवमुर्ती आणि मंठा तालुक्यातील तळणी तसेच भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे कौशल्य विकास केंद्र स्थापन करावयाची आहेत. तरी जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण भागीदार नियुक्त करण्यासाठी संस्थांनी जालना येथील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात https://tinyurl.com/32yvhytw या लिंकवरून प्रस्ताव डानलोड करून शुक्रवार दि.7 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर  यांनी केले आहे.

-*-*-*-*-

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची थकीत कर्ज प्रकरणासाठी सवलत योजना

           जालना, दि. 31 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एक रक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एक रक्कमी परतावा योजना दि.31 मार्च 2025 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी सदर योजनेचा फायदा घेवून कर्ज मुक्त व्हावे,  असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित यांचे जिल्हा कार्यालय, जालना यांच्या विविध कर्ज योजनेअंर्तगत जालना जिल्ह्यातील इतर मागास प्रर्वगातील लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज वितरीत केले आहे. जिल्हा कार्यालयाकडून वाटप झालेल्या थकीत लाभार्थींनी  महामंडळाकडून थकीत व्याज दरात 50 टक्के सवलत दि.31 मार्च 2025 पर्यंत देण्यात येणार आहे. या एक रक्कमी परतावा योजनेचा लाभ घेवुन सर्व संबधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कमेचा भरणा करुन कर्ज खाते बंद करण्यासाठी जिल्हा कार्यालय, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जालना  येथे भेट द्यावी अथवा दुरध्वनी क्र. 02482-223420 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

            जालना, दि. 31 (जिमाका) :-  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी यशश्री निवासस्थान परळी येथून शासकीय वाहनाने सकाळी 10.45 जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे आगमन.  सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वाजता भाजपा जिल्हा कार्यालयास सदिच्छा भेट, दुपारी 2 वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या नवा मोंढा येथील निवासस्थानी भेट देतील. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव.  सायंकाळी 7 वाजता  शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

Thursday, 30 January 2025

हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

जालना, दि. 30 (जिमाका) :-हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी  यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.

-*-*-*-*-

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

           जालना, दि. 30 (जिमाका) :-  लक्ष्मणराव इनामदार नॅश्नल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र व सहकार मंत्रालय आणि शासनाच्या  मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील जे.ई.एस. महाविद्यालयात दि.29 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

            कार्यशाळेस मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, उपप्राचार्य डॉ.महाविर सदावर्ते, डॉ.फाळके, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त  रश्मी नाईक, उपसंचालक अक्रिष्टा रितु, प्रतिक दंडीमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कार्यशाळेत गुणवत्तापूर्ण बीज निर्मिती, बीज संकलन, मच्छीचे कोल्डस्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजर पेठेतील उपलब्धता, राष्ट्रीय स हकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी विविध मच्छीमार संस्थेच्या मच्छीमार प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

            जालना, दि. 30 (जिमाका) :-  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि.31 जानेवारी 2025 रोजी रात्री 8  वाजता वाहनाने शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. शनिवार दि. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृहातून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सोईनुसार जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथून शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड

जालना, दि. 30 (जिमाका) :-  तरुण-तरुणी देशाचे भवितव्य आहे व आजच्या तरुणांना कौशल्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रोजगाराची संधी मिळाली पाहिजे तरच देशातील तरुण स्वतःचा विकास करून देशाचाही विकास करेल. अद्यापपर्यंत आपण जे शिक्षण आत्मसात केले आहे, त्याचे आज जीवनातील चीज म्हणजेच नोकरी मिळणार आहेअसे प्रतिपादन जे.ई.एस. कॉलेज उपप्राचार्य डॉ. महावीर सदावर्ते यांनी केले.

            जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जे.ई.एस. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि 29 जानेवारी2025 रोजी बेरोजगार तरुणांसाठी जालना येथील जे.ई.एस. कॉलेज येथे "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

प्रास्ताविकात जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी कार्यालयामार्फत तरुणांना विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात. आज रोजगार मेळाव्यामध्ये 241 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे आणि उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत असते त्यासाठी बेरोजगार तरुणांसाठी शासनामार्फत हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्म अंतर्गत जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींना रोजगार प्राप्त होतो आहे. असेही सांगितले.

रोजगार मेळाव्यात 10 नामांकित कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी मुलाखतीतून 120 उमेदवारांची विविध पदाकरिता प्राथमिक निवड केली. यात एस आर जे स्ट्रिप्स अँड पाईप्स 7, कृषिधन सीड्स 28, मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर जालना 7, आई इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट जालना 17, मोदी पाईप्स प्रा. लि. जालना 10, प्राईम सोल्युशन लिमिटेड (सलाम किसान) जालना 25, विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि. जालना 14, देवअश्व होंडा शोरूम जालना 6, स्पंदना स्फूर्ति फायनान्शियल जालना 4, भुवन हुंदाई जालना 2 अशी उमेदवारांची निवड केली गेली.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले आणि आभार सुरेश बहुरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे कौशल्य विकास अधिकारी भुजंग रिठे तसेच अमोल बोरकरकैलास काळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दिनेश उढाण, सोमेश शिंदे, अमर तुपे, शालिकराम वाघ आणि जे.ई.एस.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्रीडॉ. सुनिल इंदुरकर, डॉ. सुशांत देशमुख व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कार्यशाळा संपन्न

जालना, दि. 30 (जिमाका) :- जालना ते छत्रपती संभाजीनगर हे पुढील काळात औद्योगिक हब होण्याबाबत  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत जालना ड्रायपोर्टच्या माध्यमातून भविष्यात वेगाने निर्यात होवू शकते. जालना जिल्ह्यात उत्पादन तसेच इतर देशांना होणाऱ्या निर्यातीत वाढ होण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

 भारत सरकारच्या प्रत्येक जिल्हा हा निर्यात केंद्र या उपक्रमातंर्गत जालना जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दि.29 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उद्योग सहसंचालक बी.टी.यशवंते, महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, सहायक व्यवस्थापक पांडूरंग बावणे, अमोल मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य निर्यात धोरण अंतर्गत उद्योजकांना देय असणाऱ्या प्रोत्साहनाबाबत तसेच निर्यात धोरणाची थोडक्यात माहिती श्री.यशवंते यांनी दिली. कृषी आधारित उत्पादनांची निर्यात करण्यासंबंधी अमोल मोहिते यांनी जिल्ह्याच्या निर्यातीसंबंधी सादरीकरण केले. व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस  उद्योजक, निर्यात शेतकरी उत्पादक संघटना उपस्थित होते. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन

जालना,दि.30 (जिमाका) : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत 14567 क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन - एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.

राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करीत आहे. तसेच बेघर वृद्ध व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे. आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटूंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतच्या प्रतिसाद प्रणालीने (रिस्पॉन्स सिस्टम) राज्यात संबंधित क्षेत्रात काम सुरु केले आहे.

या हेल्पलाइनच्या सेवा देशभरात वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व वयोवृद्धांना ही सेवा उपलब्ध करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनच्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधींनी सर्व जिल्ह्यात काम सुरू केले आहे.

जिल्ह्यांमध्ये एल्डर लाईन क्रमांक 14567 च्या सेवा वाढविण्यासंदर्भात या राष्ट्रीय हेल्पलाईनच्या कार्यकारिणी सदस्यांना प्रशासनाने सहकार्य करुन हेल्पलाईनची माहिती व जनजागृती करण्याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

हेल्पलाईनवर मिळणाऱ्या सेवा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता, निदान, उपचार, निवारा- वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक ईत्यादीची माहिती दिली जाते. वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही स्तरावरील कायदे विषयक प्रकरणी, मालमत्ता, शेजारी इ. विवाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन, शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाते. चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ. विषयी जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक समर्थन दिले जाते. बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर मदत केली जाते.

हेल्पलाइनची कार्यप्रणाली एल्डर लाईन 14567 हा क्रमांक टोल फ्री आहे. एल्डर लाईनचे कार्य आठवड्यातून सर्व दिवस सुरु असते. हेल्पलाइनची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत असते. वर्षातील 362 दिवस सेवा सुरु असते (26 जानेवारी, २ ऑक्टोंबर, व १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी पूर्ण बंद असते.) हेल्पलाइनसाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे.

****

हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्म्यांना आदरांजली

           जालना, दि. 30 (जिमाका) :- हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी  यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी देखील दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांचे स्मरण केले.

-*-*-*-*-

जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

           जालना, दि. 30 (जिमाका) :-  लक्ष्मणराव इनामदार नॅश्नल अकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र व सहकार मंत्रालय आणि शासनाच्या  मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने जालना येथील जे.ई.एस. महाविद्यालयात दि.29 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

            कार्यशाळेस मत्स्यव्यवसाय प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे, उपप्राचार्य डॉ.महाविर सदावर्ते, डॉ.फाळके, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त  रश्मी नाईक, उपसंचालक अक्रिष्टा रितु, प्रतिक दंडीमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

            कार्यशाळेत गुणवत्तापूर्ण बीज निर्मिती, बीज संकलन, मच्छीचे कोल्डस्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजर पेठेतील उपलब्धता, राष्ट्रीय स हकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी विविध मच्छीमार संस्थेच्या मच्छीमार प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पुर्व परीक्षा परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

जालना, दि. 30 (जिमाका) :-  महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-2025 जालना येथील एकुण 9 उपकेंद्रावर रविवार दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे. तरी परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. हा आदेश दि.2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात

 120 उमेदवारांची प्राथमिक निवड

जालना, दि. 30 (जिमाका) :-  तरुण-तरुणी देशाचे भवितव्य आहे व आजच्या तरुणांना कौशल्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रोजगाराची संधी मिळाली पाहिजे तरच देशातील तरुण स्वतःचा विकास करून देशाचाही विकास करेल. अद्यापपर्यंत आपण जे शिक्षण आत्मसात केले आहे, त्याचे आज जीवनातील चीज म्हणजेच नोकरी मिळणार आहे, असे प्रतिपादन जे.ई.एस. कॉलेज उपप्राचार्य डॉ. महावीर सदावर्ते यांनी केले.

            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जे.ई.एस. महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि 29 जानेवारी, 2025 रोजी बेरोजगार तरुणांसाठी जालना येथील जे.ई.एस. कॉलेज येथे "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

प्रास्ताविकात जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांनी कार्यालयामार्फत तरुणांना विविध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात. आज रोजगार मेळाव्यामध्ये 241 जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे आणि उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत असते त्यासाठी बेरोजगार तरुणांसाठी शासनामार्फत हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्म अंतर्गत जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींना रोजगार प्राप्त होतो आहे. असेही सांगितले.

रोजगार मेळाव्यात 10 नामांकित कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी मुलाखतीतून 120 उमेदवारांची विविध पदाकरिता प्राथमिक निवड केली. यात एस आर जे स्ट्रिप्स अँड पाईप्स 7, कृषिधन सीड्स 28, मातोश्री स्किल डेव्हलपमेंट सेंटर जालना 7, आई इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट जालना 17, मोदी पाईप्स प्रा. लि. जालना 10, प्राईम सोल्युशन लिमिटेड (सलाम किसान) जालना 25, विक्रम टी प्रोसेसर प्रा. लि. जालना 14, देवअश्व होंडा शोरूम जालना 6, स्पंदना स्फूर्ति फायनान्शियल जालना 4, भुवन हुंदाई जालना 2 अशी उमेदवारांची निवड केली गेली.

            या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले आणि आभार सुरेश बहुरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे कौशल्य विकास अधिकारी भुजंग रिठे तसेच अमोल बोरकर, कैलास काळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, दिनेश उढाण, सोमेश शिंदे, अमर तुपे, शालिकराम वाघ आणि जे.ई.एस.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, डॉ. सुनिल इंदुरकर, डॉ. सुशांत देशमुख व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कार्यशाळा संपन्न

जालना, दि. 30 (जिमाका) :- जालना ते छत्रपती संभाजीनगर हे पुढील काळात औद्योगिक हब होण्याबाबत  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत जालना ड्रायपोर्टच्या माध्यमातून भविष्यात वेगाने निर्यात होवू शकते. जालना जिल्ह्यात उत्पादन तसेच इतर देशांना होणाऱ्या निर्यातीत वाढ होण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

 भारत सरकारच्या प्रत्येक जिल्हा हा निर्यात केंद्र या उपक्रमातंर्गत जालना जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दि.29 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उद्योग सहसंचालक बी.टी.यशवंते, महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, सहायक व्यवस्थापक पांडूरंग बावणे, अमोल मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य निर्यात धोरण अंतर्गत उद्योजकांना देय असणाऱ्या प्रोत्साहनाबाबत तसेच निर्यात धोरणाची थोडक्यात माहिती श्री.यशवंते यांनी दिली. कृषी आधारित उत्पादनांची निर्यात करण्यासंबंधी अमोल मोहिते यांनी जिल्ह्याच्या निर्यातीसंबंधी सादरीकरण केले. व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस  उद्योजक, निर्यात शेतकरी उत्पादक संघटना उपस्थित होते. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

ज्येष्ठ नागरिकांना माहिती, मदत आणि तक्रारींसाठी 14567 राष्ट्रीय हेल्पलाईन

जालना,दि.30 (जिमाका) : ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत 14567 क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन - एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल फ्री हेल्पलाईनच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार इत्यादींची माहिती व मदत देण्यात येत आहे.

राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याची ज्येष्ठांसाठीची ही राष्ट्रीय हेल्पलाईन जनसेवा फाऊंडेशन, पुणे यांच्याद्वारे चालविण्यात येत आहे. ही हेल्पलाईन टोल फ्री स्वरुपात असून, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व ज्येष्ठ व्यक्तीचे जीवनमान सुधारण्यासाठी माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार प्रदान करीत आहे. तसेच बेघर वृद्ध व्यक्तीस मदत म्हणून वृद्धाश्रमांमध्ये निवारा देण्यात येत आहे. आणि त्यांना पुन्हा त्यांच्या कुटूंबियांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतच्या प्रतिसाद प्रणालीने (रिस्पॉन्स सिस्टम) राज्यात संबंधित क्षेत्रात काम सुरु केले आहे.

या हेल्पलाइनच्या सेवा देशभरात वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व वयोवृद्धांना ही सेवा उपलब्ध करण्यासाठी जनसेवा फाऊंडेशनच्या जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधींनी सर्व जिल्ह्यात काम सुरू केले आहे.

जिल्ह्यांमध्ये एल्डर लाईन क्रमांक 14567 च्या सेवा वाढविण्यासंदर्भात या राष्ट्रीय हेल्पलाईनच्या कार्यकारिणी सदस्यांना प्रशासनाने सहकार्य करुन हेल्पलाईनची माहिती व जनजागृती करण्याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने परिपत्रक जारी केले आहे.

हेल्पलाईनवर मिळणाऱ्या सेवा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता, निदान, उपचार, निवारा- वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण विषयक, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला, करमणूक ईत्यादीची माहिती दिली जाते. वैयक्तिक आणि कौटुंबिक दोन्ही स्तरावरील कायदे विषयक प्रकरणी, मालमत्ता, शेजारी इ. विवाद निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन, शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन केले जाते. चिंता निराकरण, नातेसंबंध विषयक व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित शोक, वेळ, ताण, राग व्यवस्थापन; मृत्यूपूर्वीचे दस्तऐवजीकरण इ. विषयी जीवन व्यवस्थापनाबाबत भावनिक समर्थन दिले जाते. बेघर, अत्याचारग्रस्त वृद्ध, ज्येष्ठ व्यक्तींची सेवा व काळजी घेण्यासाठी क्षेत्रीय पातळीवर मदत केली जाते.

हेल्पलाइनची कार्यप्रणाली एल्डर लाईन 14567 हा क्रमांक टोल फ्री आहे. एल्डर लाईनचे कार्य आठवड्यातून सर्व दिवस सुरु असते. हेल्पलाइनची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत असते. वर्षातील 362 दिवस सेवा सुरु असते (26 जानेवारी, २ ऑक्टोंबर, व १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी पूर्ण बंद असते.) हेल्पलाइनसाठी सर्व जिल्हा पातळीवर क्षेत्रीय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहे.

****

Wednesday, 29 January 2025

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा मराठी भाषेचे जतन व संवर्धनाची चळवळ सर्व शासकीय कार्यालयातून उभारावी - प्रा.राजेंद्र सोनवणे

           जालना, दि. 29 (जिमाका) :- महाराष्ट्रातील सर्व व्यक्तींनी मराठी भाषेचा आग्रह धरुन समोरील व्यक्तींशी मराठी भाषेतच संवाद साधावा. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 नुसार शासकीय कामकाज 100 टक्के मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. मराठी भाषा जतन व संवर्धनाची चळवळ सर्व शासकीय कार्यालयातून उभारावी, असे प्रतिपादन मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य तथा जेईएस महाविद्यालयाचे प्रा.डॉ. राजेंद्र सोनवणे यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा समितीचे अशासकीय सदस्य तथा जेईएस महाविद्यालयाचे प्रा.राजेंद्र सोनवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार प्रणाली तायडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, नायब तहसीलदार तुषार निकम, ज्योती वाघ यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या मुख्य धोरणास अनुसरुन मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा दि.14 ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येत असतो. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालयामधून राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा केला जात असतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-