Tuesday, 19 August 2025

व्यवसाय मार्गदर्शनासाठी मोफत कॉल सेंटर

जालना दि. 19 (जिमाका) :- महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी लागणारे सहाय्य करण्यासाठी तसेच जिल्ह्यातील उद्योजक संघटना, नवउद्योजकांना व्यवसायाशी निगडीत मार्गदर्शनासह शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती जाणून घेण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्यात आले आहे. तरी आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी 18002332033, 02222622322, 02222622361 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment